हिंदी चित्रपटसृष्टीत एक अशी अभिनेत्री होती, जिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचे विशेष स्थान मिळवले होते. त्या अभिनेत्रीची एक झलक पाहायला चाहते रांगा लावायचे. ती अभिनेत्री इतर कोणी नसून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आहेत. श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. मात्र, त्यांच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. असे असले, तरीही श्रीदेवी यांच्या मुली खुशी आणि जान्हवीदेखील आपल्या आईच्या पावलांवर पाऊल टाकत आपली कारकीर्द घडवत आहेत. जान्हवीने चित्रपटसृष्टीत आपली ओळख मिळवली आहे, तर खुशी लवकरच चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वीच खुशी लाईमलाईटमध्ये असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. अशातच तिच्या एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत ती कमालीची सुंदर दिसत आहे.
खुशीने नुकताच अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती सणवारांच्या रंगात रंगलेली दिसत आहे. फोटोत दिसते की, खुशीने पिवळ्या रंगाचा पारंपारिक ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये खुशी खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोत खुशी सोफ्यावर बसून पोझ देताना दिसत आहे. तिच्या हातावरील आणि पाठीवरील टॅटूही फोटोशूटमध्ये कैद झाला आहे. दुसरीकडे तिच्या प्रत्येक फोटोत तिच्या कातिलाना अंदाजाने चाहत्यांना वेड लावले आहे. (Legendary Actress Sridevi Daughter Khushi Kapoor Latest Photoshoot During Diwali Festival Her Tattoo Goes Viral)
विशेष म्हणजे खुशीने शेअर केलेल्या या फोटोंना चाहतेच नाहीत, तर कलाकारही पसंती दर्शवताना दिसत आहेत. आतापर्यंत या फोटोला ८० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांसोबतच अंजिनी धवन, महीप कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी फेस विथ ओपन स्माईल इमोजीही शेअर केले आहेत.
नुकतेच खुशीने हॅलोवीनदरम्यान आपला एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिचे भयानक रूप पाहायला मिळत होते. हा फोटो खुशीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. यासोबत तिने कॅप्शनमध्ये “बू” असे लिहिले होते. फोटोत दिसते की, तिने गुलाबी रंगाचा डीप नेक टँक टॉप परिधान केला आहे. तसेच तिच्या तोंडातून रक्त येताना दिसत आहे. हा फोटो खुशीच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रोमँटिक अंदाजात पोझ देत होते अक्षय अन् कॅटरिना, कपिल शर्मा बनला ‘कबाब में हड्डी’