Tuesday, December 3, 2024
Home कॅलेंडर दुःखद! ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन

दुःखद! ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन

मराठी सिनेसृष्टीतून अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. ‘पिंजरा’ चित्रपटात काम केलेल्या दिग्गज अभिनेत्री वत्सला देशमुख (Vatsala Deshmukh) यांचे निधन झाले आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांनी शनिवारी (१२ मार्च) दुपारी अखेरचा श्वास घेतला.

वत्सला या प्रसिद्ध अभिनेत्री रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांच्या आई आहेत. मराठीप्रमाणे हिंदी सिनेसृष्टीतही त्या तितक्याच लोकप्रिय होत्या. वत्सला यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ‘तुफान और दिया’ या हिंदी चित्रपटातून केली होती. पुढे त्यांनी ‘नागपंचमी’, ‘फायर’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले.

मात्र वत्सला यांना ‘सुहाग’ या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. तर ‘पिंजरा’ चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांत आई, मावशी, काकू, आजी अशा विविध भूमिकेतून प्रेक्षकांना आपली प्रतिभा दाखवली.

वत्सला यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत वत्सला यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच अनेक कलाकार मंडळीही सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा