बॉलिवूडमध्ये मिस्टर पर्फेक्शनिस्ट अशी ज्याची ओळख आहे, तो म्हणजे अभिनेता आमिर खान. तसं पाहायला गेलं तर आमिर खानने चित्रपटात अनेक सुंदर अभिनेत्रींसोबत रोमान्स केला आहे. पण किरण राववर तो खरेखुरे प्रेम करत होता. त्यांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडते. आताच अशी बातमी हाती आली आहे की, किरण आणि आमिर खान घटस्फोट घेणार आहेत. खरंतर त्यांचं नातं एवढ्या लवकर संपेल याचा कोणीही विचार देखील केला नव्हता. आमिर हा किरणवर खूप प्रेम करत होता. या गोष्टीचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, एका मुलाखतीत आमिर खानने सांगितले होते की, “किरणशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. तिच्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना देखील करू शकत नाही.” ( Let’s know about Aamir Khan and kiran Rao’s first meeting )
आमिर खान (aamir khan) आणि किरण (kiran rao) हिची पहिली भेट ‘लगान’ या चित्रपटाच्या सेटवर 2001 साली झाली होती. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत होता, तर किरण या चित्रपटाची असिस्टंट डायरेक्टर होती. शूटिंग दरम्यान आमिर आणि किरणची मैत्री झाली आणि याच मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. जवळपास 3 वर्ष डेट केल्यानंतर 2005 साली त्या दोघांनी लग्न केले. त्यांना एक मुलगा देखील आहे.
आमिर खानने त्याच्या एका मुलाखतीत त्याच्या आणि किरणच्या नात्याचा खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, “मी किरणला त्यावेळी भेटलो, जेव्हा मी ‘लगान’ हा चित्रपट करत होतो. ती या चित्रपटाच्या असिस्टंट डायरेक्टरपैकी एक होती. परंतु त्यावेळी आम्ही रिलेशनमध्ये नव्हतो. आम्ही दोघे खूप चांगले मित्र होतो.”
आमिर खानने पुढे सांगितले की, “रीना सोबत घटस्फोट झाल्यानंतर काही दिवसांनी माझी पुन्हा किरणसोबत भेट झाली. एके दिवशी तिचा फोन आला आणि आम्ही जवळपास अर्धा तास बोलत होतो. तिच्याशी बोलल्यानंतर मी खूप खूश झालो होतो आणि तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. त्यानंतर आम्ही एकमेकांना डेट केले. किरणला माझी जीवनसाथी बनवून मी खूप खुश आहे. तिच्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचार देखील करू शकत नाही.”
आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत बॉलिवूडला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट सिद्ध होत असतो. त्याने ‘इश्क’, ‘लगान’, ‘3 इडियट्स’, ‘पीके’, ‘तारे जमीन पर’, ‘दंगल’, ‘धूम 3’, ‘गजनी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. लवकर तो त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटात दिसणार आहे.