Monday, July 1, 2024

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरच्या लग्नात झाला होता मोठा वाद; तब्बल १० हजार पाहुणे होते उपस्थित, खर्चाचा आकडा वाचून फिरतील डोळे

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आज सर्वत्र प्रसिद्ध आहे. 1996 साली ‘रामायणम’ या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट म्हणून पारितोषिक देखील मिळाले आहे. इथूनच त्याच्या करिअरची सुरुवात झाली. आज तो दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. गुरुवारी (२० मे) ज्युनिअर एनटीआर त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत काही रंजक गोष्टी.

एनटीआरच्या आयुष्यात अनेक वळणे आली. यातील सगळ्यात मोठे वळण म्हणजे त्याचे लग्न. त्याने लक्ष्मी प्रनथी हिच्यासोबत लग्न केले आहे. त्या दोघांनी 2011 साली लग्न केले आहे. त्यांना आज दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत बेस्ट कपल असे म्हणतात. त्या दोघांच्या लग्नात खूप वाद झाले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्या दोघांचे लग्न होणारच होते, तेव्हा एका वकिलाने एनटीआर विरुद्ध बालविवाह कायदा दाखल करण्यात आला होता. कारण तेव्हा लक्ष्मी 18 वर्षापेक्षा लहान होती. त्यामुळे त्याने लक्ष्मी 18 वर्षाची पूर्ण झाल्यावर तिच्याशी लग्न केले होते.

लग्नात सामील झाले होते तब्बल 10 हजार पाहुणे
लक्ष्मी आणि एनटीआर यांचे लग्न खूप ग्रँड झाले होते. त्यांच्या लग्नात जवळपास 10 हजार पाहुणे उपस्थित होते. अनेक अभिनेत्यांपासून ते अनेक मंत्री या लग्नाला आले होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार तेव्हा अशी बातमी आली होती की, ज्युनिअर एनटीआरच्या लग्नात त्याच्या वडिलांनी 18 कोटी रुपये खर्च केले होते.

सुरुवातीला लक्ष्मीला जुळवून घेण्यात आल्या अडचणी
ज्युनियर एनटीआरने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “लक्ष्मी लहान असल्याने तिला सगळ्या गोष्टी जुळवून घ्यायला जमत नसायचे. पण हळूहळू तिने सगळ्या गोष्टी समजून घेऊन सांभाळल्या.” अभिनेता प्रभासने देखील सांगितले होते की, लक्ष्मी त्याला खूप प्रेरित करते.

बिग बॉस २०१७ केले होते होस्ट
त्याने तेलुगुमधील बिग बॉस हा शो देखील होस्ट केला आहे. 2017 मध्ये या शो सुपरहिट झाला होता. या शोचे सगळे श्रेय अभिनेत्याला मिळाले होते. आतापर्यंत त्याला फिल्मफेअर अवॉर्डमध्ये बेस्ट तेलुगु अवॉर्ड, नंदी अवॉर्ड, आयफा यासारख्या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

आरआरआर चित्रपटात करणार धमाल
ज्युनियर एनटीआरबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच एसएस राजामौली यांनी दिग्दर्शन केलेला ‘आरआरआर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील आपला पोस्टरही त्याने शेअर केला आहे.

या चित्रपटात त्याच्या सोबत आलिया भट्ट, अजय देवगण, राम चरण हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. या सोबतच त्याने ‘स्टुडंट नंबर 1’, ‘सुब्बू’, ‘आदी’, ‘बादशहा’, ‘टेंपर’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी नवाजुद्दीनने पाहिले होते फक्त पाच चित्रपट, त्यासाठीही करायचा ४५ किलोमीटरचा प्रवास, आज आहे सुप्रसिद्ध अभिनेता

हे देखील वाचा