Wednesday, October 15, 2025
Home साऊथ सिनेमा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल, अभ्यासात देखील आहेत अव्वल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल, अभ्यासात देखील आहेत अव्वल

आपल्या आयुष्यात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. शिक्षणातूनच माणूस मोठा होत, त्याच्या आयुष्याचा उत्कर्ष होतो. कलाकार देखील याच शिक्षणातून पुढे आलेले आहेत. अनेक कलाकारांनी डिग्री घेऊनही आवड म्हणून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. पण आज ते प्रसिद्ध झाले आहेत. एक वेगळा मार्ग निवडून त्यांनी नेम आणि फेम मिळवले आहे. शिक्षणात दहावी आणि बारावीचा टप्पा खूप महत्वाचा असतो. या बोर्डाच्या निकालावर आपले करिअर अवलंबून असते. कलाकारांच्या आयुष्यात देखील असंच काहीसं असतं. चला तर जाणून घेऊया दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल.

विजय देवरकोंडा
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला अत्यंत हँडसम अभिनेता अशी त्याची ओळख आहे तो म्हणजे विजय देवरकोंडा. अभिनय क्षेत्रात तर त्याने बाजी मारलीच आहे. यासोबत शालेय जीवनात अभ्यासात देखील तो हुशार होता. त्याला दहावीच्या बोर्डला ८०% तर बारावीच्या बोर्डला ७५ % होते. विजयने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘गीता गोविंदा’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘लायगर’, ‘टॅक्सीवाला’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. (lets know the board scored on sauth indian actors)

रश्मीका मंदाना
नॅशनल क्रश अशी जिची ओळख आहे ती म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री रश्मीका मंदाना. रश्मीकाची स्टाईल आणि स्माईल सगळ्यांनाच खूप आवडते. केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाहीतर संपूर्ण देशात तिचे चाहते पसरलेले आहेत. अभ्यासात देखील रश्मीका खूप हुशार होती. रश्मीकाला दहावीला ८८ % आणि बारावीला ८२ % एवढे मार्क्स मिळाले होते.

समंथा अक्किनेनी
‘द फॅमिली मॅन २’ मधील अभिनेत्री समंथा अक्किनेनी ही एक लोकप्रिय साऊथ अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. समंथाला दहावीमध्ये ८८ % आणि बारावीला ७२ % होते. समंथाने ‘थेरी’, ‘जानू’, ‘अंजान’, ‘ओह बेबी’, ‘२४’ यासारख्या चित्रपट काम केले आहे.

विजय सेथुपती
विजय हा आताच्या घडीच्या सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विजय अभिनयासोबत शाळेत देखील हुशार होता. त्याने दहावी आणि बारावीच्या गुणांमध्ये सातत्य ठेवले होते. दहावीत आणि बारावीत त्याला ७० % एवढे गुण होते.

साई पल्लवी
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत सोज्वळ आणि सालस अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी होय. साई पल्लवीचा दाक्षिणात्य सृष्टीसोबत बॉलिवूडमध्ये देखील मोठा चाहता वर्ग आहे. साईला दहावीमध्ये ८८% तर बारावीमध्ये ८५% एवढे गुण होते.

काजल अग्रवाल
आपल्या अभिनयाचा डंका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत मिरवणारी अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल. तिने अनेक

दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. तसेच बॉलिवूडमध्ये तिने अजय देवगणसोबत ‘सिंघम’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत काम केले आहे. काजल ला दहावीला ८० % आणि बारावीला ७१ % मिळाले होते.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा