Saturday, June 29, 2024

बॉलिवूडमध्ये येण्यासाठी विजयने पाच पटींनी वाढवलं मानधन, अनन्या पांडे तर जवळपासही नाही

गुरुवारी (दि. २५ ऑगस्ट) साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्या ‘लायगर‘ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अनेकांना हा सिनेमा भलताच आवडला आहे, तर काहींना अनन्या पांडे आणि विजयची जोडी आवडली नाहीये. याव्यतिरिक्त समीक्षकांकडूनही या सिनेमाबद्दल नकारात्मक रिव्ह्यू मिळत असल्याचे बोलले जात आहे. असे असले, तरीही या सिनेमाने पहिल्या दिवशी जगभरात शानदार कमाई करत सर्वांना उत्तर दिले आहे. बक्कळ पैसा छापत असलेल्या या सिनेमातील कलाकारांनीही भरभक्कम मानधन आकारले आहे. चला जाणून घेऊया त्या कलाकारांच्या मानधनाबद्दल…

विजय देवरकोंडा
अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) त्याच्या ‘लायगर’ (Liger) या सिनेमामुळे जबरदस्त चर्चेत आहे. तो या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे, या सिनेमातून त्याने बॉलिवूड पदार्पण केले आहे. या सिनेमासाठी त्याने जबरदस्त मानधन घेतले आहे. प्रत्येक सिनेमासाठी जवळपास ६-७ कोटी रुपये मानधन घेणाऱ्या विजयने ‘लायगर’ सिनेमासाठी तब्बल ३५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

अनन्या पांडे
मोजक्याच सिनेमांमधून नावारूपाला आलेली अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) ही ‘लायगर’ सिनेमात विजयसोबत मुख्य भूमिकेत आहे. ती पहिल्यांदाच विजयसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, अनन्याने या सिनेमासाठी ३ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

रोनित रॉय
छोट्या पडद्यावरून प्रसिद्ध झालेला अभिनेता रोनित रॉय (Ronit Roy) याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. रोनित त्याच्या दमदार भूमिकांसाठी ओळखला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केले आहे. या सिनेमात तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. या सिनेमासाठी त्याने १.२ कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ronit Boseroy (@ronitboseroy)

राम्या कृष्णन
साऊथ इंडस्ट्रीतील सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री राम्या कृष्णन (Ramya Krishnan) हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिची गणना साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ramya Krishnan (@meramyakrishnan)

तिची ‘बाहुबली’ सीरिजमधील ‘शिवगामी देवी’ ही भूमिका विशेष गाजली होती. आता ती ‘लायगर’ या सिनेमातही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या पॅन इंडिया सिनेमासाठी तिने १ कोटी रुपये घेतल्याचे बोलले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
रणबीरच्या ‘त्या’ छोट्याशा कृतीने जिंकली चाहत्यांची मने, सर्वांसमोर धरले दाक्षिणात्य दिग्गजाचे पाय
बापरे! केबीसीच्या मंचावरच स्पर्धकाने शर्ट काढत मारली बायकोला मिठी, ‘अशी’ होती बिग बींची प्रतिक्रिया
नोपोटिझममुळे विजय देवरकोंडाने केले स्वत:लाच लाॅंच!, इंडस्ट्रीतील खडतर प्रवासाचा किस्सा समोर

हे देखील वाचा