Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘शेरशाह’ फेम सिद्धार्थ मल्होत्रालाही व्हायचे होते आजोबांप्रमाणेच भारतीय सैन्यात सामील; म्हणाला, ‘मला माझ्या…’

‘शेरशाह’ या चित्रपटामध्ये परमवीर चक्रने सन्मानित दिवंगत कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका सिद्धार्थ मल्होत्राने साकारली आहे. याच संदर्भात सिद्धार्थ मल्होत्राने खुलासा केला आहे की, त्याला आपल्या आजोबांप्रमाणे भारतीय लष्करात सामील होऊन देशाची सेवा करायची होती. खरं तर, ‘शेरशाह’मध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका केली होती, ज्याला लोकांकडून खूप पसंती मिळत आहे.

याच संदर्भात सिद्धार्थ मल्होत्रा ​​म्हणाला की, “मलाही माझ्या आजोबांप्रमाणे भारतीय सैन्यात सामील व्हायचे होते, ज्यांनी भारत आणि चीन यांच्यातील युद्धात देशासाठी लढा दिला होता.”

“मी या चित्रपटातून बरेच काही शिकलो आहे. मला माझ्या आजोबांकडून सैन्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यात शिष्टाचार आणि शिस्त यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. लष्कराचा व्यावसायिक दृष्टीकोन आणि ते ज्या पद्धतीने काम करतात, ते प्रशंसनीय आहे. मला वाटते की, आमचे सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यांपैकी एक आहे. मला आनंद आहे की, मी पडद्यावर एक वास्तविक जीवन योद्धा साकारण्यात यशस्वी ठरलो,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​लवकरच ‘थँक गॉड’ आणि ‘मिशन मजनू’या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे खऱ्या आयुष्यात देखील एक जोडपे आहेत. दोघांना अनेक प्रसंगी एकत्र पाहिले गेले आहे. असे असूनही या दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत माहिती दिली नाही.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​एक चित्रपट अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या भूमिका लोकांना खूप आवडल्या आहेत. त्याने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्याशिवाय आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होती. सिद्धार्थ मल्होत्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचबरोबर सिद्धार्थने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. अनेक अभिनेत्रींसोबत त्याच्या जोडीला मोठ्या पडद्यावर पसंती मिळाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिगरी यारी! अंकुश चौधरी अन् संतोष जुवेकर निघाले भटकंतीला, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

-‘हा’ दिग्गज अभिनेता नसता, तर बॉलिवूडला मिळाला नसता ‘कॉमेडीचा बादशाह’ जॉनी लिव्हर; वाचा त्यांचा रंजक प्रवास

-‘शेरशाह’च्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी बत्रा कुटुंबाला अश्रू अनावर; म्हणाले, ‘चित्रपटात सर्वकाही पाहायला मिळालं’

हे देखील वाचा