कलर्स टीव्हीवरील ‘खतरों के खिलाडी’ या शोची सर्वत्र खूपच चर्चा चालू आहे. या शोच्या निर्मात्यांनी तयारी सुरू केली आहे. खतरों के खिलाडी 11 या सिझनला देखील रोहित शेट्टी होस्ट करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. पण हा शो नक्की कधी येणार? या मध्ये कोण कोण स्पर्धक असणार? आणि हा शो नक्की कुठे शूट होणार आहे? याबाबत प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, खतरों के खिलाडी 11 सिझन हा शो ‘अबू धाबी’ येथे शूट करण्याची तयारी सुरू झाली आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर. अबू धाबी ही जागा निर्मात्यांना सुरक्षित वाटत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अबू धाबी येथे हा शो शूट करायचं असं फायनल झालं नाहीये. तरीही 80 टक्के हा शो इथेच शूट केला जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. जर परिस्थिती ठीक असेल, तर पुढच्या महिन्याच्या सुरुवातीलाच या शोच्या शूटिंगसाठी सगळेजण अबू धाबी येथे रवाना होणार आहे. या शोची शूटिंग 15 एप्रिलपासून 25 मे पर्यंत चालू राहणार आहे.
https://www.instagram.com/p/CLtqJPhh8QT/?utm_source=ig_web_copy_link
खतरों के खिलाडी या शोसाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांमध्ये अनेक वेळा बातचीत होताना दिसते. हाती आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत वरुण सूद, अर्जुन बिजलानी आणि एजान खान यांनी या शोसाठी होकार दर्शवला आहे. परंतु बाकी स्पर्धकांसोबत अजूनही चर्चा सुरू आहे.
खतरों के खिलाडी हा शो मागच्या वर्षी बल्गेरिया येथे शूट झाला होता. हा सीजन खूपच इंटरेस्टिंग चालला होता. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शोची शूटिंग थांबवली गेली. यामध्ये करिश्मा टन्ना हिला विजेती घोषित केली होती. यामध्ये रोहित शेट्टीने स्पर्धकांना खूपच खतरनाक टास्क दिले होते. या सीजनमध्ये काय होईल याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिपीका-रणवीरच्या रोमान्सच्या व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा, सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडीओ
-रश्मिका आणि कार्ती यांच्या बहूचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत