Monday, July 8, 2024

Lock Upp | कंगनाच्या ‘लॉक अप’ शोने बनवला नवा रेकॉर्ड, काय आहे हा शो आणि का होतोय फेमस? जाणून घ्या

गेल्या महिन्यात ओटीटीवर सुरू झालेला एकता कपूरचा (Ekta Kapoor) पहिला रियॅलिटी शो ‘लॉकअप’, दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) होस्ट केलेल्या या शोने आता लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. खरं तर, ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या या रियॅलिटी शोला अलीकडेच १०० दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. शोच्या या यशानंतर आता शोची संपूर्ण टीम खूप आनंदी दिसत आहे. अशा परिस्थितीत या रियॅलिटी शोची निर्माती एकता कपूरने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर सर्व चाहत्यांसाठी शेअर केली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीने सर्वप्रथम आपल्या इंस्टाग्राम पेजवर याबाबत माहिती दिली. या रियॅलिटी शोचे १९ दिवस पूर्ण झाले आहेत आणि १९ दिवसात १०० दशलक्ष म्हणजेच १०० दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. याबाबत माहिती देताना अल्ट बालाजीने पोस्ट शेअर करत लिहिले की, “बदमाश जेलचे बदमाश यश. फक्त १९ दिवसात १०० दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज. १०० दशलक्ष साजरा करण्यासाठी, आज रात्री १०.३० वाजता जजमेंट एपिसोड चुकवू नका.” (lock upp kangana ranaut show lockup got more than 100 million views)

काय आहे शो?
कंगना या शोची होस्ट आहे आणि जवळपास १६ सेलिब्रिटींना ७२ दिवस जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. जे नंतर एक एक करून शोमधून बाहेर होत जाईल. या शोमध्ये सर्व स्पर्धकांवर १४x७ लक्ष ठेवले जाते. कंगना रणौत म्हणेल तेच सर्वांना करावे लागते. बेघर होऊ नये म्हणून सेलिब्रिटींना त्यांची गुपितेही सर्वांसमोर सांगावी लागतात. एकूणच हा एक मजेदार शो आहे. एकता कपूरने या शोबद्दल आधीच सांगितले होते की, हा शो सत्य आणि वादांनी भरलेला असेल.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने होस्ट केलेला, रियॅलिटी शो एमएक्स प्लेयर आणि अल्ट बालाजीवर अगदी मोफत पाहता येतो. २४ तास प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये स्पर्धकांमध्ये सतत भांडणे, वादविवाद, अनेक धक्कादायक खुलासे पाहायला मिळत आहेत. पूनम पांडे, मुनावर फारुकी, निशा रावल, करणवीर बोहरा, पायल रोहतगी, सारा खान, अली मर्चंट असे अनेक स्पर्धक सध्या शोमध्ये दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा