Monday, July 1, 2024

नव्वद वर्षांपूर्वी ४ मिनिटांच्या ‘त्या’ किसिंग सीनने झालेला गोंधळ

भारतीय सिनेमांत आता बोल्ड सीन, किसिंग सीन सर्रास दाखवले जातात. त्याबद्दल आता फार काही आक्षेपही घेतला जात नाही. खरंतर आता आशा गोष्टींची प्रेक्षकांनाही इतकी सवय झालीये की, असे सीन पाहाताना काही वेगळे वाटत नाही. पण मंडळी पूर्वी काही अशी परिस्थिती नव्हती. लांबही कशाला जायला हवं अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंतही बोल्ड सीन दाखवताना किंवा किसींग सीन दाखवताना काही मर्यादा पाळल्या जायच्या. पण आता हळूहळू परिस्थिती बदलली आणि असे पूर्वी वल्गर वाटणारे सीन चित्रपटांत सर्रास दिसू लागले. पण तुम्हाला माहितीये का की साधारण ९० वर्षांपूर्वी भारतीय सिनेमात चक्क ४ मिनिटाचा किसिंग सीन शूट झाला होता. या सीनवरून खूप गोंधळही झालेला. काय आहे नक्की हा किस्सा चला पाहूया.

तर गोष्ट आहे, १९३३ सालची. या वर्षी कर्मा हा इंडो-जर्मन-ब्रिटीश चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात देविका राणी आणि हिमांशू राय हे दोघं मुख्य भूमिकेत होते. भारतात नुकतीच आवाज असणाऱ्या चित्रपटांची निर्मिती व्हायला लागली होती. त्याच काळात हा चित्रपट आला होता. याच चित्रपटात देविका राणी आणि हिमांशू राय यांच्यात जवळपास ४ मिनिटाचा किसिंग सीन दाखवण्यात आलेला, हा भारतीय सिनेमातील सर्वात लांब किसिंग सीन असल्याचेही सांगितले जाते.

पण, आता ३०-४० च्या दशकाचा विचार करायचा म्हणजे त्याकाळी असा सीन पाहाणे म्हणजे काहीतरी आक्रित पाहाण्यासारखं होतं. त्यावेळी कोणीही अशा सिनसाठी तयार नव्हतं किंवा कोणी अशा सिनची अपेक्षाच केलेली नव्हती. त्यामुळे खूप गोंधळ भारतात झाला. त्या सीनमुळे देविका राणी यांच्यावरही खूप टीका झाली होती. अगदी त्यांच्या चित्रपटांवरही प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. पण खरंतर तो सीन चित्रपटाच्या कथेला अनुसरून होता. म्हणजे कसं तर तो लिपलॉक वैगरे नव्हता, तर अनेक रिपोर्ट्सनुसार चित्रपटात हिमांशू राय साकारत असलेल्या पात्राला साप चावलेला असल्याने त्याला शुद्धीवर आणण्याच्या प्रयत्नात देविका राणी यांचे पात्र किस करत असते. हा सीन ४ मिनिटे शूट झाला होता. त्याचमुळे हा त्यावेळीच्या काळातील सर्वात बोल्ड सीन असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे देविका राणी आणि हिमांशू राय हे खऱ्या आयुष्यातही पती-पत्नी होते.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देविका राणी यांना भारतातील पहिल्या हिरोईन म्हणूनही ओळखले जाते. त्या ३० आणि ४० च्या अभिनय क्षेत्रात दशकात सक्रिय होत्या. देविका राणी या एका श्रीमंत घरात लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या. त्यांनी ९ वर्षे इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले होते, त्याचमुळे त्यांच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा थोडाफार प्रभाव झाल्याचंही म्हटलं जातं. साल १९२८ मध्ये त्यांची फिल्म प्रोड्यूसर आणि ऍक्टर असलेल्या हिमांशू राय यांच्याशी ओळख झालेली. १९२९ मध्ये आलेल्या ए थ्रो ऑफ डाईस हा मुकचित्रपटही त्यांनी बनवलेला. त्याच चित्रपटात देविका कॉस्च्यूम डिजायनर आणि आर्ट डिरेक्टर होत्या. याच चित्रपटातील एक महत्त्वाची घटना म्हणजे चित्रपटात सीता देवी आणि चारू राय यांच्यात एक छोटा किसिंग सिन होता, जो खूप चर्चेचा विषय ठरला होता. हा भारतीय सिनेसृष्टीतील पहिला किसिंग सीनही मानला जातो.

पण, तरीही भारतातील सुरुवातीच्या किसिंग सीनबद्दल चर्चा होते, तेव्हा देविका राणी आणि हिमांशू राय यांच्यातील कर्मा चित्रपटातील किसिंग सीनबद्दलच सर्वाधिक चर्चा केली जाते. कर्मा हा चित्रपट हिंदीत नागन की रागिनी नावाने तयार झाला होता. जो फारसा चालला नव्हता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘ठिपक्यांची रांगोळी’मधील शंशांकची खरीखुरी गर्लफ्रेंड पाहिली का? फुलपाखरूमध्ये केलंय एकत्र काम

‘ठिपक्यांची रांगोळी’मधील शंशांकची खरीखुरी गर्लफ्रेंड पाहिली का? फुलपाखरूमध्ये केलंय एकत्र काम

प्रेमिकेमुळेच ‘त्या’ सिनेमातनं झाली होता सैफची हाकालपट्टी

हे देखील वाचा