आपल्या अभिनयाच्या आणि डान्सच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजेच ऋतिक रोशन. त्याचे अनेक चाहते त्याच्या अभिनयापेक्षा त्याचा डान्स पाहण्यासाठी गर्दी करत असतात. त्याने गेली अनेक वर्षे आपल्या हटके डान्सने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याच्या दमदार अभिनयाप्रमाणेच तो दमदार मानधन देखील घेतो. ऋतिक रोशन त्याच्या एका चित्रपटासाठी २५ ते ३० कोटींच्या घरामध्ये मानधन घेतो. त्याचे कोटींच्या घरातील मानधन ऐकून तुम्हाला असे वाटत असेल की तो एका मोठ्या आणि आलिशान घरामध्ये राहत असेल. परंतु असे काहीच नाही. त्याच्या घरातील त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्याने इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याची आईदेखील दिसत आहे. त्याची आई खिडकीजवळ उभी आहे आणि तो एका टेबलाजवळ बसलेला दिसत आहे. त्याने हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आईबरोबर आळस भरलेली एक ब्रेकफास्ट डेट.”
त्याच्या फोटोवर चाहते खूप प्रेम व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होतोय. आईबरोबर ऋतिकचा हा फोटो पाहुन चाहते खुश आहेत. अशातच त्याच्या फोटोवर एका चाहत्याने बारीक लक्ष दिले आहे. त्याच्या एका चाहत्याचे या फोटोमध्ये असलेल्या भिंतीवर लक्ष गेले. त्याने कमेंट करत लिहिले की, “लक्ष देऊन बघा ऋतिक रोशनच्या घरातील भिंतींना आलेत पोपडे.” यावर ऋतिक रोशनने उत्तर देत लिहिले आहे की, “सध्या भाड्याच्या घरात राहत आहे. लवकरच मी स्वतःचे घर घेणार आहे.” त्याच्या या उत्तराने चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे. पुढे तो म्हणाला की,”आणि घराला पोपडे नसतील, तर ते ठीक करण्यामध्ये मजा कशी येईल भावा.” अभिनेत्याच्या या कमेंटने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. त्याने अशा पद्धतीने दिलेले उत्तर पाहून चाहत्यांना खूप छान वाटले. त्याचा घरामधील फोटो चाहत्यांमधील संवादानंतर चांगलाच व्हायरल होऊ लागला.
ऋतिकच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास साल २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘वॉर’मध्ये तो झळकला होता. सध्या तो राकेश रोशन दिग्दर्शित ‘क्रिश ४’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स
-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन
-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…