Monday, July 15, 2024

आता दिसताक्षणीच जेलची हवा खाणार ‘हा’ कलाकार, थेट विमानातच केलं होतं ‘ते’ कांड

सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, जे एखाद्या सामान्य व्यक्तीलाही एका रात्रीत स्टार बनवू शकते. मात्र, अफाट प्रसिद्धी मिळवूनही काही इन्फ्लुएन्सर असे असतात, जे त्यांच्या कृत्यामुळे अडचणीत सापडतात. असेच काहीसे पुन्हा एकदा घडले आहे. महत्त्वाचं म्हणजे, त्या सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरला पाहताक्षणीच अटक केली जाणार असल्याची बातमी आहे.

वादग्रस्त सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर बलविंदर कटारिया (Balwinder Kataria) म्हणजेच बॉबी कटारिया (Bobby Kataria) याला पाहताक्षणीच तुरुंगात डांबले जाणार आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे. बॉबीला जानेवारी महिन्यात स्पाईसजेट विमानात कथितरीत्या सिगारेट ओढताना पाहिले गेले होते. त्यानंतरपासूनच तो फरार आहे. ऑगस्टमध्ये एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये फ्लाईटदरम्यान बॉबी सिगारेट ओढताना दिसला होता. त्याचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ जानेवारी महिन्यातील असल्याचे बोलले जात आहे.

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आमच्या टीमने नुकतेच त्याच्या एका जागेवर छापा मारला होता. मात्र, तो तिथे सापडला नाही. आता त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. आम्ही त्याला लवकरच अटक करू.” व्हिडिओची दखल घेत केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, “आम्ही त्याची चौकशी करत आहोत. अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत.”

दिल्ली पोलिसांना स्पाईसजेटचे मॅनेजर जसबीर सिंग यांच्याकडून तक्रार मिळाली होती. तसेच,  सुरक्षा उपायांचे उल्लंघन केल्याबद्दल नागरी विमान वाहतूक कायदा 1982 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. असाही आरोप आहे की, बॉबी कटारिया याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले होते. त्यामध्ये तो 21 जानेवारी रोजी स्पाईसजेटच्या SG-706 विमानात लायटरने सिगारेट पेटवताना दिसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Kataria (@katariabobby)

डेहराडून पोलिसांनी ठेवले 25 हजारांचे बक्षीस
दुसरीकडे, उत्तराखंडमध्ये रस्त्याच्या मध्येच कथितरीत्या दारू पिल्याच्या आरोपातही कटारियाविरुद्ध डेहराडूनमधील केंट ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तराखंड पोलिसांनी डेहराडूनमध्ये रस्त्यात टेबल लावून कथितरीत्या दारू पिण्याच्या प्रकरणात फरार युट्यूबर बॉबी कटारियाविरुद्ध 25 हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिक आर्यनचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘एका फ्लॉप सिनेमाने माझे करिअर संपेल…’
कपिल शर्मानंतर मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटात दीपिकाची एंट्री, लूक पाहून चाहते फिदा
‘द काश्मीर फाईल्स’च्या दिग्दर्शकाने थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच साधला निशाणा; म्हणाले…

हे देखील वाचा