रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे दोघेजण साउथ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तर या दोघांनी 26 फेब्रुवारी रोजी लग्न केले. हे लग्न उदयपूर मध्ये परिवार आणि मित्र यांच्या उपस्थितीत पार पडले, आणि त्याच्या या लग्नकार्याला ‘वेरोश असे नाव देण्यात आले होते. तर नंतर चित्रपट सृष्टीतील सहकलाकारांना रिसेप्शन देण्यात आले होते. तर आता त्याच्या लग्नाला 1 महिना पुर्ण होउन गेला आहे. तर आता विजयच्या भावाने एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या फोटो लग्नसमारंभादरम्यान हा फोटो एका मित्राच्या लग्नात काढण्यात आला आहे. या व्हायरल फोटोमध्ये, रश्मिका विजयच्या मांडीवर बसून मित्र आणि कुटुंबीयांसोबत पोज देताना दिसत आहे. आणि चाहत्यांकडून या फोटोला प्रचंड प्रेम मिळत आहे. विजयचा भाऊ, आनंद देवराकोंडाने हे खास क्षण शेअर केले आहेत. आनंदने समारंभातील अनेक फोटो पोस्ट करून नवविवाहित जोडप्याला त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या, परंतु चर्चेचा मुख्य विषय रश्मिका आणि विजयची केमिस्ट्री होती. सारख्याच पेस्टल रंगाच्या पोशाखातील जोडप्याच्या फोटोंनी ऑनलाइन खळबळ उडवून दिली आहे.
लग्ननंतर आता रणबाली’ ह्या चित्रपटामध्ये रश्मिका मंदाना आणि विजय (vijay)देवराकोंडा एकत्र दिसणार आहेत. हा ‘रणबाली’ चित्रपट 19व्या शतकातील ब्रिटिश काळातील कथा आहे. तो 1854 ते 1878 या काळातील वास्तविक घटनांवरून प्रेरित आहे. तर या चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्स आणि टी-सिरीजच्या बॅनरखाली होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 1400 कोटींच्या कमाईसह ‘दंगल’ला दिली टक्कर









