Friday, March 6, 2026
Home हॉलीवूड लग्नाच्या तब्बल १२ वर्षांनंतर वेगळे होणार पॉप सिंगर शकीरा अन् जेरार्ड पीके, लव्हस्टोरीही आहे कमाल!

लग्नाच्या तब्बल १२ वर्षांनंतर वेगळे होणार पॉप सिंगर शकीरा अन् जेरार्ड पीके, लव्हस्टोरीही आहे कमाल!

कोलंबियाची पॉप सिंगर शकीरा (Shakira) आणि स्पॅनिश फुटबॉल लीजेंड जेरार्ड पीके (Gerard Pique) यांचे १२ वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. दोघांनी शनिवारी (४ जून) एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. शकीरा आणि पीके हे हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जात होते आणि दोघांची प्रेमकथाही एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हती. आज आम्ही तुम्हाला या दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत, ज्याची सुरुवात पीकेच्या एका प्रश्नाने झाली होती.

‘वाका-वाका’च्या शूटिंगदरम्यान झाली भेट
साल २०१० मध्ये फिफा वर्ल्ड कपसाठी ‘वाका-वाका’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान दोघे पहिल्यांदा भेटले होते. हे गाणे शकीराने गायले होते, ज्यामध्ये अनेक दिग्गज फुटबॉलपटूंसोबत जेरार्ड पीकेही दिसला होता. मात्र शकीरा फुटबॉलची चाहती नव्हती आणि त्यावेळी ती पीकेला ओळखतही नव्हती. पण गाण्याचा व्हिडिओ पाहिल्यावर तिची नजर पीकेवर खिळली आणि तिला तो खूप आवडला. (love story of columbian pop singer shakira and spanish footballer gerard pique)

जेरार्ड पीकेने केला पहिला मेसेज
एका मुलाखतीदरम्यान जेरार्ड पीकेने सांगितले की, शकीराला दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करायचे होते, त्यामुळे ती आधीच तिथे पोहोचली होती. अशा स्थितीत पीकेने तिला मेसेज करून हवामानाबद्दल विचारले. त्यानंतर शकीराने त्याला सोबत जॅकेट आणण्यास सांगितले होते. यानंतर जेव्हा जेव्हा हवामान बदलायचे, तेव्हा तेव्हा शकीरा त्याला मेसेज करायची. यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. वर्ल्डकपनंतर दोघे रिलेशनशिपमध्ये आले.

कठीण काळात पीकेने दिली साथ
साल २०१३मध्ये एका मुलाखतीदरम्यान शकीराने सांगितले होते की, जेरार्ड पीके तिच्या आयुष्यात देवासारखा आला आहे. फुटबॉलपटूला भेटण्यापूर्वी ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती आणि नंतर तिला वाटले की, तिच्या आयुष्यात एक नवीन सूर्य उगवला आहे. शकीरा जेरार्ड पीके पेक्षा १० वर्षांनी मोठी आहे, परंतु याचा त्यांचा नात्यावर काहीही परिणाम झाला नाही. २०१७ मध्ये, जेव्हा शकीराच्या व्होकल कॉर्डमधून रक्तस्त्राव सुरू झाला, तेव्हा जेरार्डने तिला त्या कठीण काळात खूप साथ दिली. त्याच वेळी, २०१३ मध्ये, दोघांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आणि आता दोघांना एक मुलगी आणि मुलगा आहे.

हे देखील वाचा