Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड काळजाला चटका लावणारी बातमी! रुग्णालयात ‘लव्ह यू जिंदगी’ म्हणत कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या मुलीचे निधन, सोनू सूदही हळहळला

काळजाला चटका लावणारी बातमी! रुग्णालयात ‘लव्ह यू जिंदगी’ म्हणत कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या मुलीचे निधन, सोनू सूदही हळहळला

कोरोना व्हायरस या सर्वात भयंकर आजाराने देशाला आपल्या तावडीत अगदी घट्ट जखडले आहे. आरोग्य यंत्रणांवरही प्रचंड ताण येत आहे. रुग्णालयात बेड शिल्लक नाहीयेत. दुसरीकडे सोशल मीडियावर दरदिवशी कोणीतरी देवाघरी जातानाचे पाहायला मिळत आहे. हे सर्व भीतीदायक आहे. अशातच आता एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये कोरोनाशी झुंज देत असलेली मुलगी शाहरुख खानच्या ‘लव्ह यू जिंदगी’ गाण्यावर थिरकताना दिसली होती. त्यावेळी तिच्या दृढ इच्छाशक्तीला सर्वांनीच सलाम ठोकला होता. मात्र, आता दु: खद बातमी समोर येत आहे. कोव्हिड- १९ने या मुलीचा जीव घेतला आहे. रुग्णालयात तिचे निधन झाले आहे. यावर ‘देवदूत’ म्हणून सध्या लोकांसाठी झटणारा सोनू सूदही हळहळला आहे. त्याने ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे.

ज्या डॉक्टरने या मुलीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता, त्यांनीच याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, “मला खूप वाईट वाटत आहे. आपण शूर आत्मा गमावला. ओम शांती. कृपया कुटुंब आणि मुलांना या संकटाचा सामना करण्यासाठी प्रार्थना करा.”

यापूर्वी १० मे रोजी डॉक्टरांनी सांगितले होते की, “त्या मुलीला आयसीयू बेड मिळाला आहे, परंतु तब्येतीत सुधारणा नाही. कृपया या मुलीसाठी प्रार्थना करा. कधी- कधी खूप असहाय्य वाटते.”

या मुलीच्या निधनावर अभिनेता सोनू सूदनेही दु:ख व्यक्त केले आहे. त्याने ट्वीट करत लिहिले की, “खूप खूप दु:खद… कधीच विचार नव्हता केला की, ती पुन्हा आपल्या कुटुंबाला पाहण्यात अपयशी ठरेल. आयुष्य हे खूप अन्यायकारक आहे. जगण्यालायक अनेक जीव होते, परंतु ते हरवले. आपले आयुष्य कितीही सामान्य का असेना, परंतु आपण या टप्प्यातून कधीही बाहेर पडणार नाहीत.”

दिल्लीच्या एका रुग्णालयात दाखल केलेल्या या ३० वर्षीय मुलीला आयसीयू बेड मिळाला नव्हता, तेव्हा ती १० दिवसांपासून कोरोना आपात्कालीन वॉर्डमध्ये कोव्हिड- १९ शी झुंज देत होती. तिला ऑक्सिजन लावण्यात आले होते. प्लाझ्माही देण्यात आला होता. रेमडेसिविर इंजेक्शनही देण्यात आले होते. तिच्या फुफ्फुसांमध्ये खूप इन्फेक्शन झाले होते आणि तिची तब्येत गंभीर होती. असे असूनही ती मुलगी उत्साहपूर्ण होऊन गाणे ऐकत होती. या व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शवली होती आणि या मुलीची प्रशंसा केली होती. परंतु आता तिने या जगाचा निरोप घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून मुलगा रणबीरसोबत नाही राहत नीतू कपूर, अभिनेत्रीने केला खुलासा

-रेमडेसिविरच्या ऐवजी एका व्यक्तीने घेतले रेमो डिसूझाचे नाव, त्यानेही शेअर केला मजेशीर व्हिडिओ; पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

-मुलगा ऋतिक रोशनप्रमाणेच राकेश रोशनही आहेत बेस्ट डान्सर? सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

हे देखील वाचा