या जगात सर्वात प्रेमळ नाते असा प्रश्न विचारला तर सर्वांचे एकच उत्तर असेल की, आई आणि तिच्या बाळाचे. मात्र या नात्याइतकेच प्रेमळ, भावनिक आणि दृढ नाते जगात आहे, आणि ते म्हणजे वडील आणि मुलीचे. आई इतकेच वडिलांचे देखील मुलांवर जीवापाड प्रेम असते. मात्र आई सारखे प्रेम ते नेहमी व्यक्त करू शकत नाही. आता वडील म्हटले तर ते सेलिब्रिटींचे वडील असले काय आणि सामान्य मुलांचे वडील असले काय वडील वडीलच असतात आणि त्यांचे प्रेमही सारखेच असते.
संजय दत्त देखील अनेकदा त्यांच्या मुलांसाठी किती पझेसिव्ह आहे, हे आपल्याला दिसते. तो त्याच्या व्यस्त कामातून मुलांसाठी नेहमीच वेळ काढत असतो. त्याचे त्याच्या मुलांवरही जीवापाड प्रेम आहे. संजयची बायको असणाऱ्या मान्यता दत्तने असाच वडील आणि मुलीचा एका सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

मान्यता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असते. ती नेहमीच तिचे तिच्या कुटुंबाबाचे फोटो पोस्ट करताना दिसते. यातच तिने नुकताच संजय दत्त आणि त्यांची मुलगी इकराचा एका सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने, ‘डॅडीज गर्ल’ अर्थात वडिलांची मुलगी असे कॅप्शन देखील दिले आहे.
मान्यताने शेअर केलेल्या फोटोमध्ये संजय आणि इकरा एका कारमध्ये बसलेले दिसत असून, संजयने इकराला मांडीवर घेतले आहे. इकरा कॅमेराकडे पाहून हसताना दिसत आहे, तर संजय दत्तचे लक्ष दुसरीकडे असून, या फोटोमधून त्यांची बाँडिंग स्पष्ट दिसून येत आहे.
मान्यताने शेअर केलेला हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. मान्यता जरी आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी ती संजय दत्तच्या प्रोडक्शन हाऊसची सीइओ आहे. संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, काही दिवसांपूर्वीच संजयचा ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात दिसला. आगामी काळात संजय ‘केजीएफ चॅप्टर 2’ या सिनेमात खलनायक साकारताना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कन्यादाना’बद्दल बोलणे ‘बबली गर्ल’ला पडले भलतेच महागात, सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप