Monday, July 8, 2024

मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्माने आपल्या डान्सने पुन्हा केले सर्वांनाच चकित, पाहा व्हिडिओ

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आणि अभिनेत्री मदालसा शर्मा सोशल मीडियामध्ये बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर मदालसा शर्माची लोकप्रियता सतत वाढतच आहे. बर्‍याचदा ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते, ज्याला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. चाहते तिच्या पोस्ट्सवर भरभरून प्रतिक्रियाही व्यक्त करताना दिसतात.

मदालसा शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आणखी तीन जणांसह ‘बन ठन चली बोलो ए जाती रे’ या प्रसिद्ध गाण्यावर नाचताना दिसली आहे.

हा व्हिडिओ शेअर करत, मदालसा शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “फॅन्टॅस्टिक फोर.” या गाण्यात मदालसा खूपच सुंदर दिसत आहे आणि त्या चौघांचाही डान्स अतिशय अप्रतिम दिसत आहे. हेच कारण आहे की, तिच्या चाहत्यांनाही हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत या व्हिडिओवर ५४ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. मदालसा शर्माचे कौतुक करत चाहत्यांनी कमेंट सेक्शन अक्षरश: भरून टाकला आहे. बॅकग्राऊंडला चमकणारे तारे पाहून एका युजर असेही लिहिले आहे की, “हे दृश्य ख्रिसमससारखे दिसत आहे.”

मदालसा प्रसिद्ध अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माता-दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. ९० च्या दशकात महाभारतात शीला यांनी देवकीची भूमिका केली होती. तसेच २००८ मध्ये मदालसाने ‘फिटिंग’ या तेलुगु चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. याशिवाय तिने ‘शौर्य’ या कन्नड चित्रपटातही काम केले आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, प्रसिद्ध टीव्ही सीरियल ‘अनुपमा’ मध्ये काव्याची भूमिका साकारून मदालसा शर्माने बरीच प्रसिद्धी मिळविली आहे. तसेच तिच्या डान्समुळे ती बर्‍याचदा सोशल मीडियावर चर्चेत राहते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-डीप नेक बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाच्या जीवघेण्या अदा! पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

-‘तुम्ही असे उड्या मारत राहिलात तर…’, फिटनेस फ्रिक मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटच्या व्हिडिओवर युजरची मजेदार प्रतिक्रिया

-‘तुला पाहून फ्लॅट झालो राव!’ ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारच्या व्हिडिओवर चाहते झाले फिदा; एकदा पाहाच

हे देखील वाचा