Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

लग्नाच्या चार वर्षानंतरही प्रेग्नेंसीचा विचार का करत नाही अनुपमाची काव्या? अभिनेत्रीने केला खुलासा

टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो अनुपमा आणि त्याची स्टारकास्ट नेहमीच चर्चेत असते. अनुपमा मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखेने घरोघरी आपला ठसा उमटवला आहे. मालिकेतील लोकप्रिय कलाकार काव्या म्हणजेच मदालसा शर्माचे नाव देखील यामध्ये समाविष्ट आहे. मदालसा ही लोकप्रिय अभिनेते मिथुन चक्रवर्तींची सून आहे. 2018 मध्ये, तिचे लग्न मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा आणि बंगाली अभिनेता महाक्षय चक्रवर्तीसोबत झाले होते. मदालसा आणि महाक्षय यांच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत.त्यामुळेच प्रत्येकजण अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची वाट पाहत आहे. अलीकडेच मदालसाने तिच्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल अनेक फोटो शेअर केले आहेत. 

हिंदी टेलिव्हिजनवरील अनुपमा ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. मालिकेची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा नेहमीच जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत असतो. मालिकेतील काव्याच्या भूमिकेतील अभिनेत्री मदालसा सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल विचारणे स्वाभाविक आहे. आणि जर ती लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री असेल तर मात्र त्यांच्या चाहत्यांना हा प्रश्न पडलेलाच असतो.असाच प्रश्न अनुपमा मालिकेतील अभिनेत्री मदालसाला विचारण्यात येत आहे. लग्नाच्या चार वर्षांनी मदालसा यांना असेच प्रश्न विचारण्यात आले. पण ती अजून आई होण्यासाठी तयार नाही. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याविषयी बोलताना ती म्हणाली की, “सेटवरील माझे सह कलाकारही मला माझ्या प्रेग्नेंसीबद्दल विचारत असतात. पण मिमोह आणि मी सध्या बेबी प्लॅनिंगचा विचार करत नाहीये.

दरम्यान, हिंदी टेलिव्हिजनचा भाग होण्यापूर्वी मदालसा बंगाली चित्रपटांमध्ये काम करत होती. यादरम्यान त्यांची आणि महाक्षय चक्रवर्तीची प्रेमकहाणी सुरू झाली. त्यांचे हेच प्रेमाचे नाते पुढे लग्नापर्यंत पोहोचले. आपल्या पतीबद्दल बोलताना मदालसा म्हणते की तो खूप काळजी घेणारा आणि प्रामाणिक पती आहे. जास्त बोलण्यापेक्षा काहीतरी करण्यावर महाक्षयचा विश्वास आहे. असे असले तरी आता त्यांच्या चाहत्यांना या जोडीकडून गुड न्यूज ऐकण्याची चांगलीच उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- गर्लफ्रेंड शेर, तर मुलगी सव्वाशेर! ललित मोदींच्या लेकीच्या सौंदर्यापुढे सुष्मिताही पडेल फिकी

‘नाकात नथ, माथ्यावर चंद्रकोर आणि ह्रदयात महाराष्ट्र’ अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या मराळमोळ्या लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Masaba Masaba Season 2 | आई नीनासोबत धमाल करायला पुन्हा सज्ज झालीय मसाबा, ट्रेलर पाहुन वाढेल उत्कंठा

हे देखील वाचा