Monday, July 1, 2024

सज्ज व्हा! २२ डिसेंबरला येतोय बॉलीवूडचा बहुचर्चित सिनेमा आपल्या भेटीला

करोना काळामध्ये सगळ्या सार्वजनिक मनोरंजनाच्या सुविधा देखील बंद होत्या. यामध्ये चित्रपटगृह, नाट्यगृह हे बंदच ठेवले होते. काही सिंगल स्क्रीन थिएटर तर या लॉकडाऊनमध्ये कायमचे बंद पडले. गेल्या वर्षीच्या अखेरच्या काही दिवसांत चित्रपटगृह हे सर्व सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज करून सुरू करण्यात आले आहेत. शासनाने चित्रपटगृह सध्या तरी ५० टक्के क्षमतेनुसार उघडण्यास परवानगी दिली आहे. यानंतर बॉलिवूडचा सर्वात आधी प्रदर्शित होणार चित्रपट इंदू की जवानी हा ठरला. आता यावर्षी तर जणू एकामागोमाग एक असे अनेक चित्रपट येऊच घातलेले आहेत. असाच एक नवा सिनेमा २२ तारखेला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर सध्या प्रदर्शित करण्यात आला आहे. चला तर मग नेमकं काय असणार आहे या सिनेमात आपण पाहुयात…

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिचा ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ चित्रपट आजकाल खूप चर्चेत आहे. यादरम्यान चित्रपटाचं पोस्टरही आता समोर आलं आहे. खरंतर गेल्या वर्षीपासून २०२० पासून या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा सुरू होती अनाजी आजही आहे. अशा परिस्थितीत रिचाने आता या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केलं आहे. या पोस्टरमध्ये रिचाने हातात झाडू घेतलेली दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर थोडीशी दुखापत झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये सौरभ शुक्ला आणि मनोज कौल हे दोन कसलेले अभिनेतेदेखील पाहायला मिळत आहेत.

https://www.instagram.com/p/CJnJPvPjUGS/

या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा एका स्त्री मुख्यमंत्र्याभोवती फिरते जिने पुरुष प्रधान समाजाला मागे टाकून स्वतः स्वत:चा मार्ग तयार केला. हा चित्रपट २२ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टी सिरीज हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे.

नुकतीच रिचा चड्ढा शकीला चित्रपटात दिसली होती. इंद्रजित लंकेश यांनी दिग्दर्शित केलेली ही एक धक्कादायक खरी कहाणी आहे. २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशी हा चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती व प्रस्तुती सॅमिस मॅजिक सिनेमा मोशन पिक्चर प्रोडक्शनने केली आहे तर यूएफओ फिल्म्सने या चित्रपटाचं वितरण केलं आहे.

त्याचवेळी सुभाष कपूरबद्दल यांच्याबद्दल बोलायचं झालं तर , या चित्रपटाच्या व्यतिरिक्त ते दुसर्‍या एका महिला राजकारण्याची कहाणीही पडद्यावर मांडणार आहेत. परंतु ती एक वेबसिरीज असेल जी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. बातमीनुसार हुमा कुरेशी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसिरीजचं शीर्षक देखील समोर आलं आहे. असं म्हटलं जातय की सुभाष कपूर या वेबसिरीजला ‘महारानी’ असं नाव देऊ शकतात.’

हे देखील वाचा