सोनीच्या मार्वल युनिव्हर्स ऑफ स्पायडर मॅन (Spider Man) सिरीजने संपूर्ण जगात धुमाकूळ घालत तुफान लोकप्रियता मिळवली. या सिरीजच्या प्रत्येक भागात येणाऱ्या ट्विस्टने या सिनेमाने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले. यासाठीच या चित्रपटाचे जगभरात तुफान चाहते आहेत. आता या सिनेमाच्या नव्या सिरीजमध्ये मेकर्स अजून नवीन काहीतरी करण्याची कल्पना आखत आहे. यावेळेस स्पाइडर मॅन स्पिन ऑफमध्ये सुपरहीरोच्या भूमिकेत हॉलिवूडमधील हिट अभिनेत्री डकोटा जॉनसन (Dakota Johnson) हॉलिवूडमधील एका माहितीनुसार डकोटा जॉनसनला स्पाइडर-मॅन स्पिन ऑफ सिनेमासाठी साईन करण्यात आले आहे. हे पहिल्यांदा होणार की, स्पायडर मॅन सिरीजमध्ये महिला सुपरहिरो जगाला वाचवताना दिसणार आहे.
या चित्रपटाचे नाव मॅडम वेब असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन एसजे क्लार्कसन करणार आहेत, तर जिम्मा मॅट सज़ामा आणि बर्क शार्पलेस हे चित्रपटाचे लेखन करणार आहेत. मात्र अजूनही सिनेमातील इतर स्टारकास्ट समोर आलेली नाही. डकोटाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ पासून खूपच लोकप्रिय झाली. हा सिनेमा २०१५ साली प्रदर्शित झाला होता. डकोटाला सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोविंग आहे. डकोटा जॉनसन नुकतीच मॅगी गिलेनहाल यांच्या ‘द लॉस्ट डॉटर’मध्ये प्रभावी अभिनय करताना दिसली. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. तिचे २०२२ मध्ये दोन मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहे. (madame web dakota johnson tapped to play first female superhero)
काही महिन्यांपूर्वीच मार्वल यूनिवर्सचा ‘स्पाइडरमॅन नो वे होम’ प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने संपूर्ण जगात तुफान कमाई केली. कोरोना काळ असूनही सिनेमाने बक्कळ कमाई केली. भारतात हा सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात टॉम हॉलैंड, टोबे मैग्युअर, जेनडारा, मैरिसा टोमेई, एंड्र्यू गैरीफील्ड, एल्फर्ड मोलिना आदी कलाकारांच्या चित्रपटात भूमिका होत्या.
हेही वाचा :