Wednesday, June 26, 2024

‘कॉर्पोरेट’ चित्रपटाला 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिग्दर्शक मधुर भंडारकरने केला ‘हा’ महत्वाचा खुलासा

मागच्या काही वर्षांपासून जुन्या चित्रपटांच्या आठवणींना त्यांच्या रिलीज डेटवर आठवण्याची प्रथाच जणू पडली आहे. याचे श्रेय जाते सोशल मीडियाला, ज्याच्या माध्यमातून त्या चित्रपटाशी संबंधित कुणी एखादे पोस्टर किंवा किस्सा शेयर करतात. यात आता अजून एक नाव जोडले गेले आहे. ते आहे, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मधुर भंडारकर यांचे. आपल्या 16 वर्ष जुन्या सिनेमाला भांडारकर यांनी एका आगळ्याच शैलीत उजाळा दिला आहे.

बिपासा बसु, केके मेनन, मिनिषा लांबा आणि राज बब्बर अशा दिग्गज तारे-तारकांनी सजलेल्या या चित्रपटाचे नाव आहे ‘कॉर्पोरेट’. या चित्रपटाला इंडस्ट्रीत गुरुवारी 16 वर्ष पूर्ण झालीत. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांनीही गौरवले होते. दोन दिग्गज उद्योगपतींमधील संघर्ष अत्यंत सुरेखपणे पडद्यावर चित्रित करणारा दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी चित्रपटाला 16 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोशल मीडियावर आपल्या भावना मांडल्या आहेत.

भांडारकर यांनी स्वदेशी सोशल मीडिया मंच ‘कू’वर बिपाशासोबत सेटवर असतानाचे काही फोटोज शेअर करत लिहिले, #16yearsoffilmCorporate हा माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे, जी कॉर्पोरेट जगातल्या रिंगसाइड व्ह्यूवर प्रकाश टाकते. बिपाशा बसु, केके मेनन @rajatkapoor_rk आणि राज बब्बर यांचा ताकदीचा अभिनय. सहारा पिक आणि प्रिसेप्ट पिक @shailendrasingh द्वारे निर्मिती.”

https://www.kooapp.com/koo/imbhandarkar/b4dc06a8-aa72-469d-a4e8-6be866e83617

या चित्रपटाची कथा मुख्यत: दोन प्रभावशाली उद्योगपतींमधल्या सत्तेच्या खेळाभोवती फिरताना दिसते. विनय सहगल यांची सहगल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज (एसजीआई) आणि धर्मेश मारवाह यांची मारवाह ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज (एमजीआई) यांच्यामधल्या सत्तेच्या खेळाभोवतीच्या कॉर्पोरेटच्या कथेत सगळ्याच व्यक्तीरेखा अतिशय कौशल्याने चितारलेल्या आहेत. दोन्ही कंपन्या खाद्य आणि पेय उत्पादनांच्या व्यवसायातल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी असतात. त्यांच्यातले राजकारण, व्यावसायिक डावपेच अगदी प्रभावीपणे चित्रित केले गेले आहेत. या सिनेमातल्या दमदार अभिनयासाठी बिपाशा बसुला को बेस्ट एक्ट्रेसचा सन्मानही मिळाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा