बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्यासाठी वेडे असणारे चाहते यांबद्दलचे अनेक किस्से आपल्याला नेहमीच ऐकाययला मिळत असतात. आपल्या लाडक्या अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची झलक पाहायला हे चाहते नेहमीच उत्सुक असतात. यासाठी ते काहीही करायला उत्सुक असतात. असाच एक किस्सा अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) बाबतीत घडला होता. ज्याचा खुलासा तिने अलिकडेच सांगितला आहे. काय आहे तो किस्सा चला जाणून घेऊ.
माधुरी दीक्षित ही हिंदी चित्रपट जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ९० च्या दशकात या धकधक गर्लच्या सौंदर्यावर सगळेच फिदा होते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने माधुरीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ९० च्या दशकातील तिच्या चित्रपटांची आजही चर्चा होताना दिसत असते. जितकी माधुरीच्या चित्रपटांची चर्चा होते तितकेच तिच्यासाठी वेडे असणाऱ्या चाहत्यांचीही चर्चा होत असते. अशाच एका चाहत्याचा किस्सा माधुरीने सांगितला आहे जो माधुरीच्या घरासमोर येऊन मला दत्तक घ्या म्हणत मागे लागला होता.
सध्या माधुरी दीक्षित तिच्या आगामी ‘द फेम गेम’ या वेबसिरीजमुळे सर्वत्र चर्चेत आहे. या आगामी वेबसिरीजचे ती जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. यावेळी एका मुलाखतीत बोलताना तिने हा किस्सा सांगितला आहे.ज्यामध्ये ती म्हणते की, “एकदा एक पन्नास वर्षाची व्यक्ती आमच्या घरासमोर आली होती. ति व्यक्ती तिचे सगळे सामान घेऊन आली होती. ज्यावेळी दार उघडले त्यावेळी तिने मला माधुरीने बोलावल्याचे सांगितले. आणि याचे कारण विचारल्यावर माधुरी मला दत्तक घेणार असल्याचे सांंगितले जे ऐकूण सगळ्यांनाच धक्का बसला. या व्यक्तीने माधुरी आणि माझी टिव्हिवर चर्चा झाल्याचे सांगितले.” माधुरीने सांगितलेला हा किस्सा ऐकूण सगळेच चकित झाल्याचे पाहायला मिळाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा