Tuesday, December 17, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘लो चली मैं, अपने देवर की बारात लेके’ गाण्यावर माधुरी दिक्षीत-रेणुका शहाणेंचा पुन्हा एकदा अफलातून डान्स

बॉलिवूडमध्ये असे खूप कमी चित्रपट आहेत, ज्यांना अगदी शंभर वेळा जरी बघितले तरी मन भरत नाही. कारण या चित्रपटातील कलाकार, त्यांचे डायलॉग आणि महत्वाचं म्हणजे चित्रपटातील गाणी यामुळेच कोणताही चित्रपट सुपरहिट होत असतो. या सुपरहिट चित्रपटामध्ये समावेश होतो, तो म्हणजे बॉलिवूडमधील दबंग खान आणि धक धक गर्ल यांच्या ‘हम आप के हैं कौन’ या चित्रपटाचा.

९० च्या दशकातील हा एक असा चित्रपट आहे, जो आजही प्रत्येकजण तितक्याच उत्साहाने पाहत असतो. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने खूप प्रसिद्धी मिळवली होती. या मधील सलमान आणि माधुरीची प्रेम कहाणी, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा विनोदी अभिनय, अनुपम खेर यांचा अभिनय, यामुळे हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. यासोबतच चर्चेत होती ती म्हणजे या चित्रपटातील गाणी. आजही या चित्रपटातील गाणी प्रत्येकाच्या ओठावर आहे. तसेच चित्रपटातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.

हम आप के हैं कौन या चित्रपटात रेणुका शहाणे यांनी माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीचे पात्र निभावले होते. या दोघींमधील प्रेम बघून प्रत्येक घरातील बहिणींमधील प्रेम जागे झाले होते. रेणुका आणि माधुरीने या चित्रपटात एका गाण्यावर परफॉर्मन्स केला होता, जो जबरदस्त हीट झाला होता. ते गाणे म्हणजे ‘लो चली मैं अपने देवर की बारात लेके.’ जे गाणे आजही अनेक लग्न समारंभात वाजवले जाते.

या चित्रपटानंतर रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित जेव्हा अनेक वर्षानंतर भेटल्या होत्या, तेव्हा त्यांनी या गाण्यावर डान्स करून पुन्हा एकदा या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हा व्हिडीओ नागपुर ऑरेंज युट्यूब चॅनेलवर २०१८साली पोस्ट केलेला आहे. या दोघींचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माधुरी जशी या चित्रपटात होती तशीच दिसत आहे, परंतु रेणुकामध्ये बराच बदल झालेला दिसत आहे. हा व्हिडिओ बघून त्यांचे चाहते त्यांचे कौतुक करत आहेत.

चित्रपटामध्ये हे गाणे सलमान खान, माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे यांच्यावर चित्रित केले आहे. या गाण्यानंतर या चित्रपटात एक वेगळाच प्रसंग दाखविण्यात आला आहे. त्यात या गाण्यानंतर लगेच रेणुका शहाणे हिचा मृत्यू दाखवला आहे. तसेच या चित्रपटातील माधुरी आणि सलमानची लव्ह स्टोरी देखील प्रेक्षकांना खूपच भावली होती. आजही चाहते त्याचा हा चित्रपट उत्साहाने पाहतात.

हे देखील वाचा