Video: ‘डान्स दिवाने’च्या मंचावर मजूर मुलगा बनला स्पर्धक; संघर्षकहाणी ऐकूण माधुरी दीक्षितच्या डोळ्यात आले पाणी

'डान्स दिवाने'च्या मंचावर मजूर मुलगा बनला स्पर्धक; संघर्षकहाणी ऐकूण माधुरी दीक्षितच्या डोळ्यात आले पाणी


कलर्स टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाणारा डान्स दिवाने हा भारतीय डान्स रिऍलिटी शो चांगलाच प्रसिद्ध आहे. या शोमध्ये कला, नृत्य आणि आपल्या शैलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांना एक नवीन प्लॅटफॉर्म मिळतो. डान्सच्या या शोमध्ये एका रात्रीत कोणाचे नशीब कधी बदलेल सांगता येणार नाही. प्रेक्षकांना या कार्यक्रमाचे मागील दोन सीजन खूप आवडले होते. आणि आता पुन्हा या कार्यक्रमाचे ऑडिशन सुरू झाले आहे.

धक धक गर्ल माधुरी दीक्षित हीच्या अदांवर तर प्रेक्षक अत्यंत फिदा होत असतात. यासोबतच धर्मेश येलांडे आणि तुषार कालिया देखील आपल्या परिक्षकांची भूमिका उत्कृष्टरित्या पार पाडत आहेत. तर राघव जुयाल आपल्या विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांना दिलखुलास हसवत असणाऱ्या ह्या मालिकेत पुन्हा एकदा देशाच्या कानाकोपऱ्यातुन विविध तरुण-तरुणी आपले नशीब आजमावत आहेत.

या कार्यक्रमाचे आतापर्यंत अनेक प्रोमो सोशल मीडियावरद्वारे समोर आले आहेत, परंतु त्यातील एक ग्रामीण तरुणाचा एक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात सदर व्यक्तीने त्याच्या गरिबीची आणि जीवनसंघर्षाची कहाणी परिक्षकांना सांगितली. ग्रामीण भागात खूपच गरिबीत राहणारा या कलाकाराने राघव जुयालच्या मदतीने त्याच्या कलेच प्रदर्शन केले होते.

यावेळी स्वतःचा परिचय देताना त्याने सांगितले की, ‘मी एक आदिवासी आहे आणि मजूर म्हणून काम करतो. माझ्या कुटुंबातील लोकांचे पालनपोषण करतो. आमच्या कॉलनीमधील लोकांना स्वप्ने पहायचे अधिकार नाही’ असे सांगत असताना तो रडतो.

तेव्हा धर्मेश त्याला धाडसी बनण्याचा आणि चांगला डान्स करण्याचा सल्ला देतो. माधुरी दीक्षित उदयची दुःखाने भरलेली कथा ऐकून खूपच भावुक देखील होताना सदर कार्यक्रमात दिसली. ज्यावेळी उदयने डान्स केला तेव्हा त्याच्या नृत्याने सर्वच चकित झाले. त्याच्या डान्स संपल्यावर धर्मेश आणि माधुरी त्याच्या डान्सची उभे राहून कौतुक करतात.

डान्स दिवाने-३ मध्ये माधुरी दीक्षित पुन्हा एकदा परिक्षक म्हणून पाहायला मिळणार असून याआधी सुद्धा दोन्ही सीजनमध्ये तीच परीक्षक म्हणून पाहायला मिळाली.  यासोबतच माधुरी दीक्षित सोशल मीडियावर देखील फार ऍक्टिव्ह असून लॉकडाऊन काळात तिने व्हर्च्युअल माध्यमातून डान्सचे व्हिडिओ अपलोड केले होते.

अलीकडेच काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या चौदाव्या सिजनमध्ये राघव सलमानकडून उत्तम होस्ट होण्यासाठी टिप्स घेत होता. यात त्याच्या मार्फत डान्स दिवाने ३ ची जाहिरात करण्यात आली ज्यात एका छोट्या मुलासोबत तो दिसला होता. या लहान मुलाने आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने आणि सलमान खानचे मन देखील जिंकले.


Leave A Reply

Your email address will not be published.