सध्या कलर्स वाहिनीवर ‘डान्स दीवाने ३’ शो खूप चर्चेत आहे. या शोचे परीक्षक अभिनेत्री माधुरी दीक्षित, तुषार कालिया आणि धर्मेश हे आहेत. याच कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री माधुरी आणि तुषार एका स्पर्धकाचा डान्स पाहून भावूक झाले. ‘लव्ह स्पेशल’ एपिसोडमधील हा परफॉर्मन्स पाहून केवळ शोचे परीक्षकच नाही, तर शोची होस्ट भारती सिंगही आपले अश्रू आवरू शकली नाही. कलर्सच्या अधिकृत ट्विटर हँडलने हा व्हिडिओ ऑनलाईन शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये रुपेश सोनी आणि सद्दाम शेख हे दोन स्पर्धक डान्स करताना दिसत आहेत. हा डान्स करत असताना या दोन स्पर्धकांपैकी एकाने भिकाऱ्याची भूमिका केलेली असते, तर दुसऱ्याने त्याच्या कुत्र्याची भूमिका केलेली असते. त्याचबरोबर या डान्समध्ये दोघांमधील संबंध दाखवले आहेत. हे दोघंही त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना आणि एकमेकांची काळजी घेत असताना दाखवले आहे. (Madhuri Dixit burst into tears when she saw this dance during the show ‘Dance Diwane 3’)
‘डान्स दीवाने ३’ शोचा आगामी भाग ‘लव्ह स्पेशल’ असणार आहे. या आठवड्यात ‘बिग बॉस १३’ चे माजी स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांचाही समावेश असणार आहे. यापूर्वी शेअर केलेल्या प्रोमोमध्ये शहनाज स्पर्धक पीयुष गुरभलेसोबत रोमँटिक डान्स करताना दिसली होती. शहनाजसोबत डान्स करताना पीयुषने सिद्धार्थला छेडले देखील होते.
Pyaar ka koyi roop nahi hota, aur aise dil ko chhuh jaane wale performance ke liye koyi shabd nahi hote ❤️
Watch #LoveSpecial #DanceDeewane3, this Sat-Sun at 8 pm only on #Colors. #DanceMachayenge #DD3
Anytime on @justvoot @ColgateIndia @NetMeds pic.twitter.com/xjKoXs1RlE— ColorsTV (@ColorsTV) August 17, 2021
या अगोदरच गेल्या आठवड्यातील भागात पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या पत्नीचे मत ऐकून माधुरी दीक्षितचे डोळे भरून आले होते. एका सैनिकाच्या पत्नीने तिला तिच्या पतीच्या मृत्यूची माहिती दिल्याचा क्षण आठवला होता. त्याचबरोबर स्वातंत्र्यदिनाच्या विशेष भागात ऑलिंपिक पदक विजेती मिराबाई चानू आणि तेथे उपस्थित असलेले सर्वजण भावूक झाले होते.
माधुरी दीक्षित मोठ्या पडद्यावर शेवटची २०१९ मध्ये दिसली होती. माधुरी दीक्षितने कलंक या चित्रपटात आपली भूमिका उत्तम पद्धतीने साकारली होती. माधुरी लवकरच नेटफ्लिक्स नाटक ‘फाइंडिंग अनामिका’द्वारे डिजिटल पदार्पण करणार आहे. त्याची कथा एका सुपरस्टार पत्नी आणि आईच्या कथेभोवती फिरते, जे अचानक गायब होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी
-‘बेलबॉटम’ रिलीझ होण्यापूर्वीच अक्षय कुमार पोहोचला लंडनमध्ये; ‘खिलाडी’ने घेतलीय मोठी रिस्क?