कलाकार आणि फॅन्स यांच्या मधले संपर्काचे माध्यम म्हणून सोशल मीडिया ओळखले जाते. काही मोजके कलाकार वगळता जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. आपल्या फॅन्ससाठी हे कलाकार अनेक वेगवेगळ्या पोस्ट नेहमी शेअर करत असतात. शिवाय आजकाल तर सोशल मीडिया म्हणजे एकप्रकारे कलाकारांचा पीआर झाला आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मीडियामध्ये नेहमी चर्चेत असतात.
आपल्या फॅन्ससोबत अनेक कलाकार लाईव्ह सेशनमध्ये गप्पा मारताना आपण पाहिले आहे. अगदी शाहरुख खानपासून ते शिल्पा शेट्टी, प्रियांका चोप्रापर्यंत अनेक कलाकार नेहमी असे सेशन घेताना आपण बघतो. आजच्या पिढीतील हँडसम आणि फिट हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायगर श्रॉफने देखील इंस्टाग्रामवर नुकतेच असे सेशन घेतले होते. या सेशनमध्ये टायगरने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली.
यावेळी एका फॅनने टायगरला त्याची आवडती अभिनेत्री कोण? असा प्रश्न विचारला. सर्वाना या प्रश्नाचे उत्तर अपेक्षितच होते. मात्र त्याने दिलेले उत्तर सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते. या प्रश्नाला उत्तर देताना टायगरने माधुरी दीक्षित असे नाव घेतले. हे नाव ऐकून सर्वांना सुखद धक्काच बसला. कारण टायगर दिशा पटानी नाव घेईल असेच सर्वाना वाटले होते. अतिशय सुंदर हास्य, मनमोहक अदा, मोहक सौंदर्य आणि उत्कृष्ट डान्स असे गुण असलेली माधुरी टायगरला देखील आवडते हे वाचून सर्वानाच आनंद झाला.
टायगर आणि दिशा पटानी मागील काही काळापासून रिलेशनशिपमध्ये असण्याच्या अनेक चर्चा मीडियामध्ये येत आहे. याला कारणही तसेच आहे. हे दोघं जेवायला, फिरायला, सुट्यांसाठी, पार्टीसाठी नेहमी सोबत जातात. शिवाय मागे काही दिवसांपूर्वी या दोघांना मुंबईमधील बीचवर सोबत स्पॉट करण्यात आले होते. लॉकडाउनच्या काळात बाहेर फिरणाऱ्या दिशा आणि टायगरला यासाठी दंड देखील भरावा लागला होता. या दोघांनी जरी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे माहिती जाहीर केली नसली, तरी या सर्व गोष्टींवरून टायगर आणि दिशा नक्कीच नात्यात असल्याचे सर्वाना वाटणारच ना.
या दोघांच्याही वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर टायगर येत्या काळात ‘हीरोपंती २’, ‘रेम्बो’, ‘गणपत’, ‘बागी ४’ आदी चित्रपटांमध्ये दिसणार असून, दिशा ‘एक विलेन रिटर्न्स’ आणि ‘के टीना’ चित्रपटात झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दुःखद! अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कलाकारांनी व्यक्त केला शोक
-‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू