कोणतीही नवीन स्टाईल आली किंवा कितीही मॉर्डन ड्रेस आले तरीही बाईचे खरे सौंदर्य खुलते ते साडीतच. अशाच बॉलिवूडमधील काही अदाकारा साडीमध्ये अवतरल्या आहेत. नजरेच्या एका इशाऱ्याने घायाळ करणारी बॉलिवूडमधील धक धक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरी सध्या ‘डान्स दीवाने ३’ या शोचे परीक्षण करत आहे . या शोमध्ये आपल्याला तिची वेगवेगळी स्टाईल पाहायला मिळते. तसेच शोमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांना नाराज न करता सगळ्यांसोबत डान्स देखील करताना दिसते. या शोमध्ये या आठवड्यात बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्री येणार आहेत. त्यांच्यासोबत माधुरीने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
माधुरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम दिसत आहे. त्या तिघीही रेशमाच्या रेघांनी या लावणीवर डान्स करताना दिसत आहे. (Madhuri Dixit, Jacqueline Fernandez and yami gautam dance on Marathi lavani)
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या तिघीही खूप सुंदर दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये जॅकलिनने लाल रंगाची साडी नेसलेली आहे, तर यामीने गुलाबी रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहेत. माधुरीने आकाशी रंगाची पैठणी नेसली असून, तिने कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ घातली आहे. यासोबत तिने केसांचा अंबाडा घातला आहे. या व्हिडिओमध्ये त्या तिघीही खूप सुंदर दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करून माधुरीने कॅप्शन दिले आहे की, “रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी, कर्नाटकी काशिदा मी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला.” त्यांचे चाहते या व्हिडिओवर सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत. सगळेजण त्यांच्या या डान्सचे कौतुक करत आहेत. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत २.३ मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच कमेंट्स वर्षाव होत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिसल्या सायरा बानो; हातात होता दिलीप कुमारांचा फोटो
-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’










