बॉलिवूडमध्ये सौंदर्याची आणि हास्याची देणगी लाभलेली अभिनेत्री म्हणजे ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित होय. माधुरी प्रेक्षकांवर जेवढी मोहिनी तिच्या अभिनयाने आणि डान्सने घालते, तेवढीच किंबहुना त्याहून अधिक मोहिनी ती तिच्या सौंदर्याने आणि हास्याने घालत असते. आज तिच्या वयाच्या ५४ व्या वर्षी देखील माधुरीच्या मोहक सौंदर्याची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. या संपूर्ण जगात माधुरी न आवडणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.
सध्या माधुरी टेलिव्हिजनपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र दिसत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असणारी माधुरी नेहमीच तिचे वेगवेगळ्या वेशभूषेतील फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करताना दिसते. नुकतेच माधुरीने तिचे हिरव्या रंगातील लेहंग्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये माधुरी कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या सुंदरतेपुढे आजच्या काळातील आघाडीच्या अभिनेत्री देखील फिक्याच पडतील इतके छान मेंटेन माधुरीने स्वतःला ठेवले आहे. (madhuri dixit nene looks gorgeous in green lehenga)
तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती बोल्ड आणि सोबतच स्टायलिश देखील दिसत आहे. माधुरीने घातलेला लेहंगा हा प्रसिद्ध फॅशन डिझायनर अमित अग्रवालने डिजाईन केला असून, त्याची किंमत १.९५,००० हजार इतकी आहे. माधुरीचा हा लेहंगा मेटॅलिक स्ट्रक्चर्ड पॉलिमरपासून तयार करण्यात आला असून, हे कापड लाइटवेट आणि नॉन स्ट्रेचबेल आहे, तर दुपट्टा आणि ब्लूजसाठी ट्यूल आणि ऑर्गेंजा फॅब्रिक वापरले आहे. या लेहंग्यावर कॉर्डिड हॅन्ड एम्ब्रॉइडरी केली गेली आहे.
माधुरीने तिचा लूक परफेक्ट करण्यासाठी कोणत्याही हेव्ही दागिन्यांचा वापर न करता फक्त मॅचिंग कानातले घातले आहे. मेकअप देखील खूप साधा असून फक्त फिचर शार्प करत केसांचा जुटा घातला आहे. ती तिच्या या लूकमध्ये अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. तिला फॅन्स आणि कलाकारांच्या देखील या लूकवर भरपूर कमेंट्स येत आहेत.
माधुरीने कालानुरूप तिच्या स्टाईल स्टेटमेंटमध्ये बरेच बदल केल्याचे आपल्याला तिचे फोटो पाहून लक्षात येईलच. ती नेहमी स्वतःवर हटके व आकर्षक प्रयोग करत असते. माधुरी लवकरच ‘फाइंडिंग अनामिका’ मधून तिचे डिजिटल पदार्पण करणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–अपरा मेहतांनी आपल्या अभिनयाने जिंकली चाहत्यांची मने; तर एकाच व्यक्तीशी थाटला होता दोनदा संसार
–झी मराठीवरील ‘या’ मालिकेत तिहेरी भूमिकेत झळकणार संकर्षण कऱ्हाडे, चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण