Wednesday, February 5, 2025
Home बॉलीवूड ‘आजा नचले’मधील माधुरी दीक्षितची मुलगी आज दिसतेय ‘अशी’, अनेक हिट सिरीजमध्येही केलंय काम

‘आजा नचले’मधील माधुरी दीक्षितची मुलगी आज दिसतेय ‘अशी’, अनेक हिट सिरीजमध्येही केलंय काम

‘आजा नचले’ चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) मुलीची भूमिका निभावणारी अभिनेत्री दलाई (Dalai) ही सध्या डिजिटल मनोरंजन विश्वात जोरदार चर्चत आहे. आता ती सुपर मॅाडल ही बनली आहे. रंजीव मूलचंदानी यांची मुलगी दलाई नुकतीच काही ओटीटी सीरीजमध्ये दिसली होती. काही वृत्तानुसार, ती आता मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.

एकेकाळी आपल्या आईवर निर्भर राहणारी दलाई आता खूप मोठी झाली आहे. तिने १५ वर्षापुर्वी माधुरी दीक्षित सोबत घालवलेल्या ‘आजा नचले’ या चित्रपटाच्या काही आठवणी शेअर केल्या आहे. ती म्हणते की, “मी खूप वेळा माधुरी यांना त्यांच्या टीम सोबत चालताना बघत होते आणि त्यांच्या एक असिस्टंट सुद्दा सोबत असायचा, जो त्यांच्यासाठी नेहमीच छत्री घेऊन उभा असायचा. एका दिवशी मी माझ्या आईकडे बघितले आणि मला ही छत्री पाहिजे म्हणाले. तेव्हा माझ्या आईने सांगितले की, माधुरी यांनी खूप चित्रपटात काम केले आहे. त्यांचा चित्रपटातील जीवन प्रवास खूपच सुंदर आहे. त्यांची त्वचा चांगली राहावी, मेकअप खराब होऊ नये आणि ऊन्हात त्यांचा चेहरा खराब होऊ नये, म्हणून एक असिस्टंट नेहमीच छत्री घेऊन त्यांच्या आजुबाजुला असतो. त्यानंतर आई मला म्हणाली की, तुझ्यासाठी छत्री कोण पकडणार? त्या वेळेस मी म्हणले, आई तू. हे ऐकुन आईने मला लाडाने एक चापट मारली.”

दलाईने ‘आजा नचले’ सोडून अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ‘फिल्लौरी’ या चित्रपटातही काम केले आहे आणि ऍमेझॉन प्राइम व्हिडिओची लोकप्रिय सिरीज ‘मेड इन हेवन’ मध्येही काम केले आहे. सध्या ती नेटफ्लिक्सवरील ‘एटरनैली कन्फ्यूज्ड एंड ईगर फॉर लव’ जोरदार चर्चत आहे. तिला नुकतेच काही मोठ्या भूमिकेचे ऑफर आल्या आहेत आणि ती लवकरच याबाबत बोलणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा