Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ‘धकधक गर्ल’ने शेअर केला गरबा व्हिडिओ, मनमोहक एक्सप्रेशन्स पाहून हरपलंय चाहत्यांचं भान

‘धकधक गर्ल’ने शेअर केला गरबा व्हिडिओ, मनमोहक एक्सप्रेशन्स पाहून हरपलंय चाहत्यांचं भान

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर राहते. चाहतेही तिच्या फोटोंवर खूप प्रेम व्यक्त करतात. बॉलिवूडच्या ‘धक-धक गर्ल’च्या डान्सचे सर्वजण अक्षरशः वेडे आहेत. आजकाल माधुरी डान्स रियॅलिटी शो ‘डान्स दिवाने’मध्ये जज म्हणून दिसत आहे. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

सध्या नवरात्रीचा सण चालू आहे. अशामध्ये सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार गरबा- दांडियाचे आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच माधुरीनेही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती, ‘मेहेंदी’ या गाण्यावर गरबा करताना दिसत आहे. गाण्याच्या धूनवर माधुरी ज्याप्रकारे नाचत आहे, ते पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. यातील एक्सप्रेशन्स आणि अदांसह माधुरी खूपच सुंदर दिसत आहे. (madhuri dixit shared her garba video on social media)

यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा अतिशय सुंदर लेहंगा घातला आहे, ज्यात तिचं मनमोहक रूप चाहत्यांना भुरळ घालत आहे. या व्हिडिओवर चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच यावर तब्बल २ लाख २७ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

माधुरी दीक्षित आजकाल तिच्या वेब सीरिज ‘फाइंडिंग अनामिका’विषयी चर्चेत आहे. या मालिकेद्वारे तिने ओटीटीवर पदार्पण केलं आहे. ही वेब सिरीज एक सस्पेन्स फॅमिली ड्रामा सिरीज आहे. यात माधुरी दीक्षितसोबत संजय कपूर, मानव कौल हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा