Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘ओ रे पिया’ गाण्यावर ‘धक-धक गर्ल’च्या अदा पाहून, चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका!

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर राहते. चाहतेही तिच्या फोटोंवर खूप प्रेम व्यक्त करतात. बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’च्या डान्सचे सर्वजण अक्षरशः वेडे आहेत. आजकाल माधुरी डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘डान्स दिवाने’मध्ये जज म्हणून दिसत आहे. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

मुंबईत लॉकडाऊन दरम्यान सेलेब्स सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. माधुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ‘ओ रे पिया’ गाण्याची धून वाजत आहे. गाण्याच्या धूनवर माधुरी चालताना दिसत आहे. चालताना तिचे केसही हवेत उडत आहेत. या अदांसह माधुरी खूपच सुंदर दिसत आहे.

माधुरी काही दिवसांपूर्वीच पती डॉक्टर श्रीराम नेनेसमवेत मालदीवमध्ये सुट्टी घालवताना दिसली. यादरम्यान या दोघांनी खूप एन्जॉय केला. त्याचवेळी माधुरीने सोशल मीडियावरही बरेच फोटो शेअर केले, ज्यात ती आणि नेने एकत्र दिसले.

नुकतीच नोरा फतेही ‘डान्स दिवाने’च्या सेटवर पोहोचली. समोर आलेल्या प्रोमो व्हिडीओमध्ये नोरा माधुरीचे कौतुक दिसली. नोरा म्हणाली की, “मी देवदास एक अब्ज वेळा पाहिला असेल. जेव्हा कोणी मला विचारतात की, तुमची प्रेरणा कोण आहे, तुम्ही भारतात का आलात? तर मी नेहमीच माधुरी यांचे नाव घेते.” नोराचे बोलणे ऐकून, माधुरी तिचे आभार मानले. यानंतर नोरा आणि माधुरीने ‘एक दो तीन’ आणि ‘मेरा पिया घर आया’ या गाण्यांवर एकत्र डान्सही केला.

माधुरी दीक्षित आजकाल तिच्या वेब सीरिज ‘फाइंडिंग अनामिका’ विषयी चर्चेत आहे. या मालिकेद्वारे ती ओटीटीमध्ये पदार्पण करत आहे. ही वेब सिरीज एक सस्पेन्स फॅमिली ड्रामा सिरीज आहे. यात माधुरी दीक्षितसोबत संजय कपूर, मानव कौल हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.

हे देखील वाचा