Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या लूकवर भडकले चाहते; म्हणाले ‘सर्जरीने चेहऱ्याची वाट लावली…’

धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या लूकवर भडकले चाहते; म्हणाले ‘सर्जरीने चेहऱ्याची वाट लावली…’

माधुरी दीक्षित टीव्हीवर एकामागून एक शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसते. सध्या ती ‘झलक दिखला जा 10’ मध्ये जज बनली आहे. त्याच्याशिवाय शोचे इतर जज करण जोहर आणि नोरा फतेही आहेत. ‘झलक दिखला जा’ कार्यक्रम पाच वर्षांनंतर परतला आहे, म्हणून डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षितने कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. सोमवारी, पापाराझींनी तिला सेटवर पाहिले. तिने लाल रंगाची साडी नेसली होती. परंतु या लूकवरुन माधुरीला जोरदार ट्रोल केले जात आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

माधुरी दीक्षित ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. माधुरीच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. मात्र अलिकडेच तिच्या लूकवरुन ट्रोल केले जात आहे. माधुरी झलक दिख लाजा च्या सेटवर नुकतीच लाल साडीमध्ये दिसली होती.

माधुरी दीक्षितने पापाराझींसमोर पोज दिली. माधुरी गोड स्माईलसाठी ओळखली जाते परंतु यावेळी तिच्या ओठांच्या आकारात बदल झाला, त्यानंतर यूजर्सनी तिच्या ओठांच्या शस्त्रक्रियेबद्दल अंदाज लावला. अनेक युजर्सनी व्हिडीओवर लिहिले की तिने बोटॉक्स केले आहे. त्यामुळेच माधुरीच्या या लूकवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एका यूजरने लिहिले, ‘तिच्या चेहऱ्याला बोटॉक्सने काय केले आहे?’ एका दुसऱ्या यूजरने कमेंट केली, ‘ही सुनंदा पुष्कर आहे की माधुरी?’ तर आणखी एका यूजरने  ‘चेहरा खूप गोंधळलेला दिसत आहे.’ असे म्हणले आहे. माधुरीच्या लिप सर्जरीवर युजर्सनी कमेंट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात, जेव्हा ती ‘झलक दिखला जा 10’ च्या प्रोमो शूटसाठी पापाराझींसमोर दिसली तेव्हाही नेटकऱ्यांनी अशाच प्रतिक्रिया दिल्या होत्या.

हेही वाचा – वेबसिरीजमधून होणार राजीव गांधी हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा, ‘या’ दिग्गज दिग्दर्शकाने घेतली जबाबदारी
विचित्र ड्रेस घातल्याने रुबिना दिलैक झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘दुसरी उर्फीच…’
‘टायगर 3’ चित्रपटात झळकणार अभिनेता शाहरुख खान, ‘या’ दिवशी होणार शुटिंगला सुरुवात

हे देखील वाचा