Monday, July 1, 2024

पारंपारिक ड्रेसमध्ये ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित दिसतेय एकदम भारी! तब्बल ‘इतक्या’ किमतीत तुम्हीही घेऊ शकता विकत

बॉलिवूड मधील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींमध्ये ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा समावेश होतो. ती नेहमीच स्वतःच्या स्टाईल आणि फॅशन‌ सेन्समुळे खूपच चर्चेमध्ये असते. माधुरीने आत्ताच काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडियावर मालदीवचे काही फोटोज शेअर केले होते. जिथे ती खूपच एन्जॉय करत होती. तिने आता पारंपरिक पोशाखातील फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहेत. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिने घातलेल्या या ड्रेसची किंमत जवळपास 60 हजार एवढी आहे.

माधुरीने हे फोटोज तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने पारंपारिक पोशाख घातला आहे. माधुरीने घातलेला हा पिवळा ड्रेस खूपच सुंदर दिसत आहे. तसेच तिने इअररिंग आणि गळ्यात देखील हार घातला आहे. एका खांद्यावर ओढणी घेऊन तिने पोज दिली आहे. माधुरीने घातला हा ड्रेस तमन्ना पंजाबी कपूरच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ज्याची किंमत 59,500 रुपये एवढी आहे.

माधुरी नुकतेच काही दिवसांपूर्वी मालदीवला गेली होती. तिने मालदीव‌मधील काही ग्रुप फोटो शेअर केले होते. तिच्या त्या फोटोंवर चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले होते. माधुरीने तिच्या कुटुंबासोबत सुट्ट्या खूप एन्जॉय केल्या.
माधुरीसोबतच तिचा पती श्रीराम नेने यांनी देखील मालदीवमधील काही फोटोज शेअर केले होते. तिथे ते कपल डेट नाईट एन्जॉय करताना दिसले. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये दोघेही सोबत खूपच सुंदर दिसत होते.

माधुरी दीक्षित सध्या रियालिटी शो ‘डान्स दिवाने 3’ मध्ये जज आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ‘कलंक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच नेटफ्लिक्स सीरिज ‘फाइंडिंग अनामिका’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरुणाचल प्रदेशातील आगीत नुकसान झालेल्या लोकांसाठी धावून आले वरुण- नताशा, केली ‘इतक्या’ लाख रुपयांची मदत

-अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणींना राणीचा ‘गुरुमंत्र’, म्हणाली ‘…तर तुम्ही खुशाल या’

-‘इंडियन आयडल १२’ चा भाग बनल्यामुळे गायिकेने साधला ‘सदाबहार’ अभिनेत्री रेखावर निशाना, तर अनु मलिकला म्हटले क्रूर

हे देखील वाचा