Friday, July 5, 2024

‘डान्स दिवाने’च्या सेटवर कोरोनाचा शिरकाव! तब्बल १८ सदस्यांना विषाणूची लागण

कोरोना महामारीपासून कोणीही वाचू शकलेले नाही. सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटीही कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. टीव्हीच्या जगातही कोरोनाचा उद्रेक चालूच आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित जज करत असलेल्या लोकप्रिय डान्स रियॅलिटी शो ‘डान्स दिवाने’च्या जवळपास 18 सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. मंगळवारी (30 मार्च) चित्रपट उद्योग कर्मचारी संघटनेने ही माहिती दिली.

कलर्स चॅनेलच्या प्रवक्त्याने पुष्टी केली की, ‘डान्स दिवाने’च्या च्या तिसर्‍या सिझनमध्ये काही सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. परंतु संक्रमणाची नेमकी संख्या ही त्यांनी उघड केली नाही.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयीचे (एफडब्ल्यूईसीएस) सरचिटणीस अशोक दुबे यांच्या मते, कार्यक्रमाच्या टीममधील 18 सदस्यांना व्हायरसची लागण झाल्याचे आढळले आहे. ते पुढे म्हणाले की, “एकाच शोच्या सेटवर इतक्या मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाची लागण होण्याची घटना अत्यंत खेदजनक आहे आणि प्रत्येकाने याबाबतीत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

दुबे यांनी पीटीआयला सांगितले की, “दोन दिवसांपूर्वी युनिटमधील 18 सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. ते घरीच विलगीकरणात राहत आहेत. त्यांच्या जागेवर दुसऱ्या लोकांकडून काम करून घेण्यात आले, तेव्हा शूटिंग पूर्ण झाली.” त्यांनी सांगितले की, माधुरी दीक्षित आणि या शोचे अन्य जज निरोगी आहेत. माधुरी दीक्षित व्यतिरिक्त या शोचे जज धर्मेश आणि तुषार कालिया आहेत, तर राघव जुयाल या शोला होस्ट करतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खबरदारी महत्त्वाची! बीएमसीच्या कारवाईनंतर अभिनेत्री झाली सावध, स्वत: सोबत फोटोग्राफर्सचेही हात केले सॅनिटाईझ

-मोठी बातमी! ड्रग्ज प्रकरणात अभिनेता एजाज खानला एनसीबीने मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात, ‘या’ टोळीशी संबंध असल्याची शक्यता

-“फोनवर तिचा आवाज ऐकला की हृदय तुटतं” म्हणत सतीश कौशिक झाले आजारी मुलीच्या आठवणीत भावुक

हे देखील वाचा