Monday, April 21, 2025
Home साऊथ सिनेमा ‘अभिनेता सूर्या आणि ‘जयभीम’ चित्रपटाच्या टीमविरोधात कोणतीही कारवाई करु नका’, मद्रास हायकोर्टाचा आदेश

‘अभिनेता सूर्या आणि ‘जयभीम’ चित्रपटाच्या टीमविरोधात कोणतीही कारवाई करु नका’, मद्रास हायकोर्टाचा आदेश

सध्या  दाक्षिणात्य सिनेमांची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. यामधील जयभीम हा चित्रपट प्रचंड गाजला होता. २०२१ मध्ये आलेल्या ‘जयभीम’ चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा तर मिळालीच त्याचबरोबर चित्रपटाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचाही प्रामणिक प्रयत्न केला गेला. त्यामुळेच या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले. इतकेच नव्हेतर या चित्रपटाची ऑस्कर नामांकनासाठी निवडही करण्यात आली होती. मात्र या चित्रपटावर एका ठराविक समुदयाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचाही आरोप करण्यात आला होता. यावर आता मद्रास हायकोर्टाने महत्वपुर्ण निकाल दिला आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, दाक्षिणात्य अभिनेता सुर्याचा ‘जयभीम’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाचे जितके कौतुक करण्यात आले. तितकाच तो वादाच्या भोवऱ्यातही सापडला. चित्रपटातून एका विशिष्ठ समाजाला चुकीच्या पद्धतीने  दाखवण्याचा आरोप लावण्यात आला होता. यामुळेच चित्रपटाचा मुख्य अभिनेता सुर्या, दिग्दर्शक टी. जे. ग्नानावेल आणि अभिनेत्री ज्योतिका विरोधात केसही नोंदवण्यात आली होती. यावर आता मद्रास कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला असून चित्रपटांच्या दिग्दर्शकांसह अभिनेता सुर्याला दिलासा मिळाला आहे.

दिनांक १८ जुलैला मद्रास हायकोर्टाने याबाबत महत्वाचा निर्णय देण्यात आला.ज्यामध्ये या केसची संपूर्ण चौकशी आणि कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत सुर्या आणि चित्रपटाच्या संपूर्ण टिमविरोधात कोणतेही कठोर पाऊल उचलले जाऊ नयेत असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. न्यायाधीश सतिशकुमार यांनी या केसच्या सुनावणीला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर आता यासंबंधित पुढील सुनावणी २१ जुलैला होणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयापर्यंत चित्रपटाच्या टीमविरोधात कोणतेही कठोर पाऊल उचलले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान बहुचर्चित ‘जयभीम’ चित्रपटात एका विशिष्ठ समुदायाला पोलिस उचलून नेतात. त्यांना जेलमध्ये प्रचंड शारिरिक यातना दिल्या जातात. असे दाखवण्यात आले होते.  तसेच चित्रपटात हिंदी बोलणाऱ्या एका मानसाला कानाखालीही दाखवण्यात आले होते. त्यामुळेच  या चित्रपटाविरोधात नाराजी दर्शवली जात होती. परंतु आता कोर्टाच्या निर्णयामुळे कलाकारांना आणि चित्रपटाच्या टीमला दिलासा मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा