Thursday, March 28, 2024

महाराष्ट्रात कोरोनाची लाट! चित्रपटगृहांसह गर्दीच्या ठिकाणांसाठी नियमावली केली जाहीर

कोरोनाचे प्रकरण पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्रात तर परिस्थिती सर्वात चिंताजनक आहे. वाढते कोरोना प्रकरण लक्षात घेता, राज्य सरकारची चिंताही वाढत चालली आहे. महाराष्ट्रातील सहा शहरांमध्ये लॉकडाऊन व नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

आता राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे. त्यानुसार चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल्स आणि कार्यालये सर्व 50% क्षमतेसह उघडतील. तसेच, हा नियम 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहील.

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे. नियमांनुसार मास्क न लावणाऱ्या व्यक्तीला चित्रपटगृह, हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिली जाणार नाही. तापमान मोजण्याचे साधन वापरणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे, जेणेकरून एखाद्याला ताप असेल, तर ती व्यक्ती आत जाऊ शकणार नाही. पुरेसे सॅनिटायझर ठेवले गेले पाहिजे. सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. दरम्यान, चित्रपटगृह, हॉटेल्स, रेस्टॉरंट्समधील नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले, तर केंद्र सरकार जोपर्यंत त्यांच्यावरून कोरोना साथीच्या रोगाचे आपत्तीचे टॅग काढून घेत नाही, तोपर्यंत ते बंद केले जातील.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सामाजिक, सांस्कृतिक किंवा कोणताही राजकीय कार्यक्रम असो, कोणत्याही प्रकारे गर्दी करण्यास सक्त मनाई केली गेली आहे.

लग्नाच्या कार्यक्रमातही 50 हून अधिक लोकांना आमंत्रित करण्यावर प्रतिबंध घातला गेला आहे. त्याच वेळी, अंत्यसंस्कारादरम्यान केवळ 20 लोकच सहभागी होऊ शकतात. कोव्हिड संक्रमित रुग्णाला 14 दिवसापर्यंत विलगीकरणात राहावे लागेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कल्लू मामा’ची भूमिका साकारून गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य; वाचा सौरभ शुक्ला यांचा जीवनप्रवास

-विरुष्काच्या पहिल्या भेटीचा ‘तो’ किस्सा होता विराटला अस्वस्थ करणारा; वाचा काय घडले होते त्यावेळी?

-संगीतकाराने भावाच्या नावालाच बनवले आपले आडनाव, म्हणाला ‘माझं नाव साजिद वाजिद असं आहे आणि…’

हे देखील वाचा