Sunday, June 22, 2025
Home मराठी महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कार संपन्न, यावर्षी पुरस्कारांवर दिसले ‘चंद्रमुखी’चे वर्चस्व

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कार संपन्न, यावर्षी पुरस्कारांवर दिसले ‘चंद्रमुखी’चे वर्चस्व

नुकतेच २०२३ या नवीन वर्षातील मराठी सिनेसृष्टीचे पहिले पुरस्कार संपन्न झाले. ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा पुरस्कार सोहळा कलाकारांसाठी खूपच महत्वाचा असतो. महाराष्ट्रातील जनता त्यांच्या मतांच्या आधारे त्यांच्या आवडीच्या कलाकाराला सर्वोत्कृष्ट म्हणून निवडत असते. त्यामुळे या पुरस्कारांना इतर पुरस्कारांच्या तुलनेत जास्त महत्व आहे. कलाकार जरी हे पुरस्कार विजेत्या लोकांना देत असले तरी हे थेट दर्शकांकडूनच त्यांना मिळत असतात. यावर्षी हा पुरस्कार कोणकोणत्या कलाकारांना, कलाकृतीला मिलर याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण यावर्षी अनेक मोठे कलाकार आणि मोठमोठ्या कलाकृती एकमेकांसमोर उभ्या होत्या. अखेर यावरून पडदा बाजूला झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

मोठ्या दिमाखात यावर्षीचे हे पुरस्कार पार पडले. या पुरस्कारांमध्ये ‘चंद्रमुखी’ या सिनेमाने सर्वात जास्त पुरस्कार पटकावले आणि बाजी मारली आहे. अभिनेता आदिनाथ कोठारेने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. आदिनाथने दिलेल्या माहितीनुसार अमृता खानविलकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओक, सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी अजय-अतुल आणि श्रेया घोषाल यांना पुरस्कार मिळाले आहेत. तर प्रसाद ओकला शिवसेनेचे दिवंगत नेते असलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी, धर्मवीर सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आदिनाथच्या या पोस्टवर प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे, मंजिरी ओक, अमृता खानविलकर, जयवंत वाडकर, आदी कळकरांनी कमेंट्स करत एकमेकांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला ‘पांडू’ सिनेमातील तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी अनेक दमदार कलाकरांना मागे सारत या कलाकारांनी पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. यावर्षी अनेक मोठ्या कलाकारांमध्ये पुरस्कारासाठी चुरशीची लढाई पाहायला मिळाली. लवकरच हे पुरस्कार प्रेक्षकांना झी टॉकीज वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दाक्षिणात्य अभिनेत्री शुभ्रा अय्यप्पाने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप केले लग्न, पाहा भन्नाट फाेटाे

इंडियन आयडॉलमध्ये रीना रॉयचे कौतुक पडले शत्रुघ्न सिन्हा यांना महागात; पत्नी म्हणाली, ‘तू घरी…’

हे देखील वाचा