Wednesday, June 26, 2024

‘हा पृष्ठभाग बघून…’ प्रसाद खांडेकरने पोस्ट शेअर करत दिला शाळेच्या ‘त्या’ सुंदर आठवणींना उजाळा

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ‘शाळा’ खूप मोठी भूमिका बजावत असते. शाळेत असताना कधीच तिची किंमत समजत नाही. मात्र जेव्हा शाळा संपते आपण पुढे कॉलेजला जातो तेव्हा मात्र शाळा काय असते हे लक्षात येते. माणसाच्या आयुष्यात शाळेच्या कधीही न संपणाऱ्या असंख्य आठवणी आहेत. शाळा संपल्यानंतर मोठे झाल्यावर अनेकदा पुन्हा ते शाळेचे जीवन जगता यावे असे सगळ्यांनाच वाटते मात्र प्रत्येकालाच ते शक्य होईल असे नाही. मात्र काहींना ते सुख पुन्हा नक्कीच अनुभवता येते. असाच नशीबवान ठरला आहे, मराठी मनोरंजनविश्वातील एक कलाकार. आपल्या शाळेत जात त्याने त्याच्या वर्गात जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून तुफान प्रसिद्धी आणि विनोदी अभिनेता अशी उपाधी मिळवलेला प्रसाद खांडेकर सर्वांनाच माहित आहे. प्रसादने त्याच्या कॉमिक टायमिंगच्या जोरावर घराघरात ओळख मिळवली आहे. आज प्रसादने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शाळेच्या आठवणींशी संबंधित एक फोटो आणि काही ओळी पोस्ट केल्या आहेत. त्याने त्याच्या अकाउंटवर शाळेत असणाऱ्या बाकाचा अर्थात बेंचचा फोटो शेअर केला आहे, या फोटोवर कर्कटकने, पेनने काहीतरी विचित्र लिहिले असून ते पाहून सर्वांनाच त्यांचे शाळेचे दिवस नक्कीच आठवतील.

प्रसादने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “हा पृष्ठभाग बघून हे काय आहे सांगा, लहानपणी आपल्या पैकी बऱ्याच जणांनी असे पृष्ठभाग पेनाने ….करकटक ने रंगवले असतील ….असे पृष्ठभाग रंगवणे
पेन फायटिंग खेळणे, डोळ्यांची स्पर्धा लावणे, पुस्तक उघडून त्यातल्या पेज नंबर नुसार मॅच खेळणे,
हे खेळ आता पुन्हा खेळणं नाही होणार, Miss those golden days, माझी शाळा, चोगले हायस्कुल बोरिवली.”

प्रसादने शेअर केलेल्या या पोस्टमुळे अनेकांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यामुळे त्याला या आठवणींना उजाळा देण्यासाठी अनेकांनी धन्यवाद म्हणत त्याचे कौतुक केले आहे, प्रसादच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो एक उत्तम विनोदी अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम लेखक देखील आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये अनेक स्किट तो लिहीत असतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हॉट! मालदीवच्या समुद्रावर फुलल तुलसी कुमारचं सौंदर्य
‘तुम्ही भारताला….’, आरआरआर चित्रपटाच्या गोल्डन यशावर नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

हे देखील वाचा