सोनी मराठी चॅनेलवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय आहे. हसवून हसवून लोकांचे खऱ्या अर्थाने टेन्शन घालवणारा हा शो कोणी पाहिला नसेल असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. या शोमुळे प्रेक्षकांना एक उत्तम मनोरंजनाचे माध्यम मिळाले हे नक्की. मात्र सिनेसृष्टीला अनेक उत्तम विनोदी कलाकार देखील या शोने दिले आहेत. असाच या शो मधील एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध विनोदी कलाकार म्हणजे गौरव मोरे. फिल्टरपाड्याचा बच्चन अशी नवीन ओळख गौरव मोरेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोने मिळवून दिली आहे. गौरवने त्याच्या विनोदाच्या प्रतिभेमुळे संपूर्ण महाराष्ट्र्रात एक विनोदी अभिनेता अशी ओळख मिळवली आहे. आज गौरव त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्या दिवशी त्याला त्याच्या मित्रमैत्रिणींकडून आणि फॅन्सकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहे. मात्र यात एका व्यक्तीने त्याला खूपच खास अंदाजमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात दिसणाऱ्या समीर चौगुलेने सोशल मीडियावर गौरवसाठी एक सुंदर संदेश लिहीत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समीर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गौरव देविदास मोरे…भावा…तू तो अपना शेर है…तुझ्या बद्दल मी काय लिहिणार!! अत्यंत वेगळी विनोदाची शैली असलेला आमचा गौऱ्या अल्पावधीतच जगातल्या मराठी माणसांच्या गळ्यातला ताईत झालाय…आज आमच्या गौऱ्याचे आबाल वृध्द फॅन आहेत यातच त्याची मेहनत आणि कामावरील प्रेम दिसून येते…तुझ्यातली उत्स्फूर्तता आणि तुझ्यावर रसिकांचे असलेले प्रेम कायम राहो…आणि तुला जे जे आयुष्या कडून हवंय ते दुपटीने मिळो…भावा…वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा”. अतिशय सुंदर मेसेज समीर यांनी गौरवसाठी लिहिला असून, सोबतच हास्यजत्रेच्या सेटवरचा त्याचा एक फोटो देखील शेअर केला आहे. समीर चौगुले यांच्या या पोस्टवर गौरवने उत्तर देताना “दादा लव्ह यू” अशी कमेंट केली आहे.
गौरव आणि समीर यांनी हास्यजत्रेमधे अनेक स्किट सोबत केले आहेत. त्यांची स्किट नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असते. याशिवाय त्या दोघांची केमिस्ट्री देखील सर्वांना फार आवडते. दरम्यान गौरवने या शोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगात नावलौकिक मिळवला आहे. नुकतीच महाराष्ट्राच्या हास्यजत्रेची टीम दुबई वारी करून आली. त्याचे देखील अनेक फोटो व्हिडिओ कलाकारांनी शेअर केले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठ्या दणक्यात सुरु आहे प्रभासच्या आगामी ‘सालार’ सिनेमाची शूटिंग, समोर आले फोटो
मोठी बातमी! बॉलिवूडमधील ज्येष्ठ चित्रपट निर्माता महेश भट्ट यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया, प्रकृती गंभीर…