साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक एसएस राजामौली पुढच्या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रेक्षक या चित्रपटाविषयी सतत नवीन माहितीची वाट पाहत असतात. चाहते सतत सोशल मीडियावर चित्रपटाच्या नावाचे अपडेट्स विचारत असतात. अशा परिस्थितीत या चित्रपटाबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
हैदराबादमध्ये चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन वेगाने सुरू आहे. त्याचवेळी, आता या चित्रपटाच्या शूटिंगबाबत नवीन माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या शूटिंग सुरू होण्याची तारीख अद्याप निर्मात्यांनी उघड केलेली नाही, कारण एसएस राजामौली यांना सर्व काही आधी व्यवस्थित ठरवायचे आहे. मात्र, आता या चित्रपटाच्या शूटिंगसंदर्भातील नवीन माहितीने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. ‘SSMB 29’ चे शूटिंग नोव्हेंबर २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती आहे.
यासोबतच रामोजी फिल्म सिटीमध्ये ‘एसएसएमबी 29’चे शूटिंग सुरू होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. यासाठी विशेष सेट तयार करण्यात येणार असून, त्यासाठी मोठ्या योजना आखल्या जात आहेत. त्याचवेळी महेश बाबूने या चित्रपटासाठी काही कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. एसएस राजामौली हे त्यांचे चित्रपट बनवण्यात बराच वेळ घालवण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या नवीन चित्रपटातही असेच काही घडणार आहे.
कथेबद्दल बोलताना, चित्रपटाचे लेखक केव्ही विजयेंद्र प्रसाद यांनी यापूर्वी सांगितले होते की हा चित्रपट आफ्रिकन जंगलांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि इंडियाना जोन्स ॲडव्हेंचर टेम्पलेटची कथा दर्शवेल. त्याच वेळी, महेश बाबू या चित्रपटासाठी एक वेगळा लूक तयार करत आहेत आणि काही काळापूर्वी एसएस राजामौली यांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळण्यास सांगितले होते, जेणेकरून चित्रपटासाठी त्यांचा लूक गुप्त ठेवता येईल. त्याचबरोबर या दोघांनीही चित्रपटाच्या कथेबाबत मौन बाळगले आहे. त्यांनी अद्याप शीर्षक देखील उघड केलेले नाही.
महेश बाबू आणि एसएस राजामौली ‘SSMB 29’ च्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट जंगल साहस चित्रपट मानला जात असून हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, या चित्रपटात पौराणिक कथा आणि भारतीय महाकाव्यांची झलक पाहायला मिळणार आहे, जो राजामौली यांचा ट्रेडमार्क आहे. महेश बाबूने एसएस राजामौली यांच्या चित्रपटासाठी अभिनय कार्यशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण दोन्ही सुरू केले आहेत. दिग्दर्शकाने ज्येष्ठ अभिनेते नस्सर यांची महेश बाबूचे शिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
इम्रान खान करणार पुनरागमन; आमीर खान प्रोडक्शन करतेय ओटीटी वर निर्मिती