Monday, July 15, 2024

बॉलिवूड आणि हॉलिवूड पदार्पणाबद्दल महेश बाबू म्हणाला, “मला हिंदी सिनेमे करण्याची…’

सध्या दाक्षिणात्य सिनेमे आणि दाक्षिणात्य कलाकार तुफान गाजताना दिसत आहे. सगळीकडे फक्त साऊथ इंडस्ट्रीचा बोलबाला दिसून येत आहे. अनेक साऊथ कलाकार बॉलिवूडमध्ये देखील काम करताना दिसत असून, काही लवकरच पदार्पण करणार आहे. असे असूनही बरेच साऊथ कलाकार असे आहेत ज्यांना पॅन इंडिया ओळख असली तरी त्यांना बॉलिवूडमध्ये काम करण्यास काडीमात्रही रस दिसत नाही. सामान्यपणे पाहिले तर प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना नेहमीच बॉलिवूडचे वेध लागलेले असतात, पण काही कलाकरांना बॉलिवूडमध्ये काम करण्यामध्ये अजिबात आवडत नाही. आता तेलगू इंडस्ट्रीमधील किंबहुना साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेता असलेल्या महेश बाबूचेच घ्या.

एका कार्यक्रमानिमित्त महेश बाबू मुंबईत आला होता. या कार्यक्रमादरम्यान त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले यातच एक प्रश्न होता, महेश बाबूच्या बॉलिवूड आणि हॉलिवूड पदार्पणाबद्दल. त्याच्या अनेक फॅन्सला त्याच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती. चला तर जाणून घेऊया त्याने या प्रश्नांना काय उत्तर दिले.

तसे पाहिले तर महेश बाबू नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच महेशला त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल मीडियाने प्रश्न विचारला यावर तो म्हणाला, “मला हिंदी सिनेमे करण्याची गरज नाही मी फक्त तेलगू चित्रपट करू शकतो. आणि हे तेलगू सिनेमे संपूर्ण जगात पाहिले जात आहे.” यानंतर त्याला त्याच्या हॉलिवूड पदार्पणाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मला कोणत्याच हॉलिवूड सिनेमाबद्दल किंवा प्रोजेक्टबद्दल माहिती नाही.” महेश बाबूच्या या स्पष्टीकरणानंतर त्याच्या बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या पदार्पणाच्या सर्व बातम्या ह्या निव्वळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. तत्पूर्वी महेश बाबू हा त्याच्या बिनधास्त आणि बेबाक अंदाजासाठी तुफान प्रसिद्ध आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त तेलगू चित्रपटांचाच बोलबाला दिसून येत आहे. यात नुकताच प्रदसरहित झालेला जुनियर एनटीआर, रामचरण यांचा ‘आरआरआर’ हा आणि अल्लू अर्जुन रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा’ या सिनेमाचा समावेश आहे. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडत बक्कळ कमाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा