बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये अनेक प्रकरणे समोर आली. त्यात दिग्दर्शक महेश भट्ट हेदेखील सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांच्यावर अनेकांनी आरोप केलेले समोर आले आहे. अशातच आता अभिनेत्री लविना लोधने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओत महेश भट्ट यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
लविनाने म्हटले आहे की, महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबाने तिला त्रास दिला. या आरोपांनंतर महेश भट्ट यांच्या प्रॉडक्शन हाऊसकडून एक वक्तव्य करण्यात आले आहे.
महेश भट्ट यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, लविना लोधच्या या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांनी लविनाचे हे आरोप फेटाळले आणि म्हटले की, हे सर्व खोटे आहे. सोबतच कायदेशीर कारवाई करण्याचेही त्यांनी म्हटले आहे.
‘विशेष फिल्म्स’च्या वकिलाने महेश भट्ट यांच्याकडून म्हटले, “ही पोस्ट लविना लोधने शेअर केलेल्या व्हिडिओबाबत आहे. आम्ही आमचे क्लाएंट महेश भट्ट यांच्याकडून आरोप फेटाळतो. हे आरोप केवळ खोटे आणि प्रतिमा मलीन करण्याचे आहेत. सोबतच कायदेशीररीत्या गंभीर परिणाम देणारे आहेत. आमचे क्लाएंट कायदेशीर कारवाई करतील.”
यापूर्वी लविनाने व्हिडिओ पोस्ट करत म्हटले होते की, “नमस्ते माझे नाव लविना आहे. मी हा व्हिडिओ माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी बनवत आहे. माझे लग्न महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवालसोबत झाले होते. मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. कारण मला समजले होते की, तो अमायरा दस्तूर आणि सपना पब्बी यांसारख्या कलाकारांना ड्रग्स सप्लाय करतो. त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या मुलींचे फोटो असतात. हे फोटो तो दिग्दर्शकांना दाखवतो. तो मुलीही सप्लाय करतो. याची सर्व माहिती महेश भट्ट यांना आहे.”
Truth as i know it. I m being harrased by Mahesh Bhatt & family. Pls support. pic.twitter.com/545IGBs35A
— Luviena Lodh (@LuvienaLodh) October 23, 2020
लविनाने आरोप केला की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठा डॉन महेश भट्ट आहे. आणि ते पूर्ण सिस्टीम ऑपरेट करतात. तिने पुढे म्हटले की, “जर तुम्ही त्यांच्या नियमाने चालला नाहीत, तर ते तुमचं जगणं कठीण करतात. महेश भट्टने अनेक लोकांचे आयुष्य बर्बाद केले आहे. अनेक कलाकार, दिग्दर्शक, संगीतकारांना त्याने कामावरून काढले आहे. त्यांच्या एका फोनमुळे लोकांची कामे संपुष्टात येतात. लोकांना हे माहितीसुद्धा होत नाही.”
“जेव्हापासून मी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे, तेव्हापासून ते मला त्रास देत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे ते माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत,” असेही तिने पुढे बोलताना म्हटले.