Monday, July 1, 2024

ज्येष्ठ रंगकर्मी तथा अभिनेते महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे दुःखद निधन

मराठी रंगभूमीवरील दिग्गज अभिनेते, नाट्य-चित्रपट निर्माते आणि अभिनेता महेश कोठारे यांची वडील अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. अभिनेत्री आणि त्यांची नातसून असलेल्या उर्मिला कोठारे हिने याबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मुंबईमधील बोरिवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, सून नीलिमा कोठारे, नातू आदिनाथ कोठारे , नातसून उर्मिला कोठारे, पणती जिजा कोठारे असा परिवार आहे.

अंबर कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी वेगवेगळी कामे करत घराला हातभार लावला. अंबर कोठारे यांनी दिवाळीच्या काळात गिरगावमध्ये रस्त्यावर उटणे विकण्याचे काम केले होते. पुढे त्यांनी शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘ब्रिटिश बॅंक ऑफ दि मिडल इस्ट’ या बँकेत नोकरी करण्यास सुरुवात केली. तब्बल चाळीस वर्षी त्यांनी बँकेत वेगवेगळ्या पदांवर काम केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare)

नोकरी करत असताना त्यांनी त्यांची कला देखील जपली आणि प्रायोगिक रंगभूमीवर काम केले. त्यादरम्यान त्यांनी अनेक उत्तम नाटकांमध्ये काम करत नाटकांची निर्मिती देखील केली. ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (INT) संस्थेच्या मराठी विभागाचे पहिले सचिव होते. अंबर कोठारे यांनी केलेल्या प्रमुख नाटकांपैकी एक म्हणजे ‘जेथे जातो तेथे’. या नाटकाच्या लेखनासाठी अंबर कोठारे यांनी प्रख्यात लेखक दत्ता भट यांना नाशिकवरून मुंबईला येण्यासाठी पाचारण केले होते. या नाटकामध्ये दत्ता भट यांच्यासोबतच अंबर कोठारे यांनीदेखील अभिनय केला होता. याशिवाय ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे त्यांनी शेकडो प्रयोग केले. ‘झुंजारराव’ नाटकामधील त्यांची भूमिका विशेष गाजली.

महेश कोठारे यांच्या यशात आणि त्यांच्या आवडीमध्ये अंबर यांची झलक त्यांच्या जवळच्यांना स्पष्ट दिसायची. महेश यांनी देखील अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन यांमध्ये आपल्या वडिलांचेच गुण अंगिकारले होते. ‘दे दणादण’ या चित्रपटामध्ये अंबर कोठारे यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीने साकारली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अखेर निरोपाची वेळ आलीच…माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

ब्रेकिंग! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यााल अटक, अभिनेत्रीला त्रास आणि अश्लील मेसेज पाठवण्याचा लावला आरोप

 

हे देखील वाचा