Monday, April 28, 2025
Home मराठी ‘वरन भात लोन्चा…’ सिनेमा प्रकरणी महेश मांजरेकरांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

‘वरन भात लोन्चा…’ सिनेमा प्रकरणी महेश मांजरेकरांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील सर्वात दिग्गज, यशस्वी आणि हुशार दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून ओळखले जातात. ते दिग्दर्शित करत असलेले सिनेमे नक्कीच प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देऊन जातात. त्यांचे सिनेमे म्हटल्यावर प्रेक्षकांना देखील उत्सुकता असते, मात्र नुकताच त्यांचा प्रदर्शित झालेला सिनेमा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ वादात अडकला आहे. या चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे या चित्रपटावर चांगलीच टीका होत असून, या सिनेमाविरोधात कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. मात्र आता या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने उत्तर दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून महेश मांजरेकर यांना या याचिकेवर दिलासा देत सांगितले की, “पुढची सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नका”.

mahesh-manjrekar
Photo Courtesy Instagrammaheshmanjrekar

महेश मांजरेकरांचा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या सिनेमाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमधील काही सीनवरुन हा वाद सुरु झाला. हे सीन चित्रपटातून काढून टाकण्यात यावेत आणि हा ट्रेलरही युट्यूबवरुन काढून टाकावा. अशी मागणी महिला आयोगाने पत्र लिहून केली होती. त्यानंतर सर्व सोशल मीडिया माध्यमातून चित्रपटाचा ट्रेलर काढण्यात आला.

Photo Courtesy Instagram maheshmanjrekar

महेश मांजरेकरांविरोधात पॉक्सो काद्याच्या कलम १४ अंतर्गंत कारवाई करण्यात आली आहे. या कलमानुसार इलेक्ट्रॉनिक मीडिया, इंटरनेट अथवा कोणत्याही टीव्ही मालिकेतून मुलांवर अश्लिल पद्धतीने चित्रीकरण करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते. चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र मिळाले आणि हा सिनेमा प्रदर्शित देखील झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होताना या सिनेमातील आपत्तीजनक गोष्टी काढून टाकल्या होत्या. जयंत पवार यांच्या कथेवर आधारित असलेल्या या सिनेमात मुंबईतील गिरणी कामगारांचे आयुष्य दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा