बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीने साल १९९७ मध्ये ‘परदेस’ या चित्रपटामधून अभिनयाला सुरुवात केली. या सिनेसृष्टीला तिचे आजवर मोठे योगदान लाभलेले आहे. अभिनेत्री कायमच समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर स्वतःचे मत मांडते. अशात तिने आता पुन्हा एकदा एका विषयावर स्वतःचे मत मांडले आहे. तिने यावेळी थेट बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. त्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
गेल्या काही वर्षंपासून महिमा सिनेसृष्टी पासून दूर आहे. नुकतीच एका वृत्तपत्राला तिने मुलाखत दिली होती. यावेळी तिने बॉलिवूडमध्ये पूर्वी सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टी समोर आणल्या आहेत. मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, “बॉलिवूड इंडस्ट्री आता त्या पातळीवर पोहचली आहे जिथे महिला कलाकारांना देखील चांगली संधी दिली जात आहे. अभिनेत्रींना चांगल्या भूमिका, चांगले पात्र आणि चांगले मानधन मिळत आहे. त्यांच्याकडे आता पहिल्या पेक्षा एक चांगले आयुष्य आहे.”
पुढे ज्यावेळी ती स्वतः अभिनय क्षेत्रात होती त्यावेळची परिस्थिती सांगत म्हणाली की, “आधीच्या काळात महिला कलाकारांना जास्त स्वतंत्र नव्हते. त्यांना त्यांचे खासगी आयुष्य नेहमी लपवून ठेवावे लागत होते. जेव्हा त्या एखाद्या व्यक्तीला डेट करायच्या तेव्हा त्यांना त्याबद्दल गोपनीयता बाळगावी लागायची. अनेक निर्मात्यांना चित्रपटात काम करण्यासाठी वर्जिन अभिनेत्री हव्या होत्या. त्यांना अशा मुली हव्या असाच्या ज्यांनी कधी किस देखील केलेले नसेल.”
पुढे लग्न आणि मुलांविषयी सांगताना ती म्हणाली की, “जर तुमचे लग्न झालेले असेल तर ते म्हणायचे, अरे आता तुझे लग्न झाले आता तुझे काम थांबणार. यामध्ये पुढे जर मुलं झाली तर मग तू कधीच काम नाही करू शकणार, तुझे करिअर थांबणार असे म्हटले जायचे.”
तसेच अभिनेत्यांवर असलेल्या निर्बंधांबाबत बोलताना ती म्हणाली की, “या सर्व गोष्टी अभिनेत्यांबरोबर देखील होत होत्या. त्यांना देखील त्यांचे खासगी आयुष्य लपवून ठेवावे लागत होते. एखाद्या कलाकाराचा चित्रपट येऊन तो प्रदर्शित झाला की, बऱ्याच काळानंतर आम्हाला समजायचे आमक्याचे लग्न झाले.” महिमाची ही मुलाखत चांगलीच गाजत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–सनी आणि बॉबी या सावत्र मुलांसोबत कसे आहे हेमा मालिनी यांचे नाते, स्वतः ड्रीमगर्लनेच केला होता खुलासा
–अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सूर्यवंशी ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये करणार धमाका
–नुसरत जहाँ अन् यश दासगुप्ताने गुपचूप उरकलंय लग्न? पुन्हा दिली अभिनेत्रीने ‘हिंट’