Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘स्तनाच्या कर्करोगा’बद्दल अभिनेत्री माहिरा खानचं मोठं वक्तव्य; म्हणाली, ‘पाकिस्तानामधील 9 पैकी एक महिला…’

जगभरात महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो तो स्तनांचा कॅन्सर, तसेच स्तनांच्या कॅन्सरने ग्रस्त महिलांची संख्या वाढतेय. परंतु, आताही लोकांमध्ये याबाबत जनजागृतीचा अभाव आहे. त्याचवेळी, पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक माहिरा खानने स्तनाच्या कर्करोगची जनजागृतीबद्दल सांगितले आहे. अलीकडेच, माहिरा खान(Mahira Khan) हिने स्तनाच्या कर्करोगाबद्दल आपले मत व्यक्त केले, ज्यामुळे लोकांना त्याची जाणीव झाली आहे. यासोबतच त्यांनी हे देखील सांगितले आहे की, पाकिस्तानमध्ये हा आजार किती वेगाने वाढत आहे.

या संभाषणात बोलताना माहिरा खान म्हणाली, “मला 10 वर्षे पूर्णे झाली आहेत, मी 10 वर्षांपासून स्तनाच्या कर्करोगसाठी जनजागृतीचे काम करत आहे. आणि 10 वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या स्त्रिया आणि मुलींमधला फरक आपल्याला पाहायला मिळतो. आम्हाला वाटते की फरक पडला आहे, लोकांमध्ये जागरूकता आली आहे, लोक त्याबद्दल बोलू लागले आहेत. पूर्वी लोकांना याबद्दल बोलायला आणि स्तन हा शब्द वापरायला लाज वाटात होती.

याविषयी ते पुढे म्हणाले, “स्तन या शब्दातबद्दल लाज वाटण्यासारखे काही नाही, शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे हा देखील एक शरीराचा अवयव आहे. आणि पाकिस्तानच्या लोकांना हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण पाकिस्तानमधील नऊपैकी एक महिला स्तनाच्या कर्करोगाने आजारी आहे, ही एक मोठी संख्या आहे.”

माहिरा पुढे म्हणाली, “आपल्याला याबद्दल मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे, लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. आपल्या घरातील पुरुषांनीही याविषयी मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. कारण समस्या तेव्हा येते जेव्हा महिलांना याविषयी बोलता येत नाही तेव्हा त्यांना वाटते की माझा नवरा, भाऊ, माझा मुलगा काय विचार करणार किंवा काय बोलणार. हा एक कर्करोग आहे ज्यावर वेळेवर उपचार केल्यास टाळता येऊ शकतो. या संभाषणाच्या शेवटी माहिरा खान म्हणाली की, इंटरनेटच्या माध्यमातून आपण स्तनाचा कर्करोगाबद्दल जागरूक राहू शकतो आणि मला खात्री आहे की आपण लोकांमध्ये जागृता निर्माण करु शकतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हॅपी बर्थडे ऐश्वर्या I तुम्हाला माहितीये अभिषेकसोबत लग्न होण्यापूर्वीही ऐश्वर्याचं लग्न झालंय, विश्वास बसत नसेल तर ही बातमी वाचा

‘मला माफ करा भाईजान…’; असं काय घडलं की केआरकेनं जोडले सलमानपुढे हात

हे देखील वाचा