रॅपच्या जगातील प्रसिद्ध कलाकार म्हणजे सृष्टी तावडे. सृष्टी नेहमीच तिच्या रॅपमुळे प्रकाशझोतात येत असते. मुंबईकर असणाऱ्या सृष्टीला ‘हसल’ या शोमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. याशिवाय तिचे ‘मै नही तो कौन बे’ हे रॅप साँग तुफान हिट झाले आणि मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाले. यामुळे तिची प्रसिद्धी आणि लोकप्रियता अधिकच वाढली. ‘हसल’ गाजवून पण ती हा हा शो जिंकू शकली नाही. आता पुन्हा एकदा सृष्टी चर्चेत आली आहे. मात्र आता ती प्रकाशझोतात येण्याचे कारण खूपच वेगळे आणि भयंकर आहे. तिच्यावर लहान असताना तीन वर्ष अत्याचार झाले असल्याचे तिने या कार्यक्रमांत सांगितले.
या कार्यक्रमात सृष्टीने सांगितले की, “माझ्या कुटुंबात मी आणि माझ्यासोबत आई, वडील, भाऊ आणि मोलकरीण असे आम्ही पाच जणं राहायचो. माझे आई-वडील ऑफिसला गेले की, आमच्या घरात गुपचूप एक माणूस यायचा. आमची मोलकरीण आणि तो माणूस रिलेशनशिपमध्ये होते. आमच्या मोलकरीणसाठी आणि त्या माणसासाठी मी अडचण ठरायची. त्यामुळे मला शांत ठेवण्यासाठी आमची मोलकरीण मला खूप मारायची. सोबतच यातले काहीही आईला सांगायचे नाही असे सांगायची. त्यामुळे माझे बालपण मोलकरणीच्या मारहाणीतच गेले. मला लहान असताना झालेल्या या मारहाणीचा अगाथी आजही कधीकधी मला त्रास देतो.”
View this post on Instagram
पुढे सृष्टी म्हणाली, “कदाचित आमच्या मोलकरणीला मला मारायला खूप आवडत असेल म्हणूनच ती मला रोजच वेगवगेळ्या पद्धतीने मारायची. तीन वर्ष तिने मला विविध पद्धतीने मारले होते. माझे आयुष्य तिने पूर्णपणे अक्षरशः नरक केले होते. माझ्या घरात असणाऱ्या सर्व गोष्टी तिने मला मारण्यासाठी वापरल्या होत्या.” पुढे सुष्टी म्हणाली, “मी आज जरी यातून बाहेर आली असली तरी माझ्यावर याचा खूपच खोल परिणाम झाला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पॅपराझींना पोज दिल्याने सैफ करीनावर रागावला? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
रजनीकांत यांच्या मुलीचे लग्नातील लाखोंचे दागिने चोरीला; ‘या’ व्यक्तिवर व्यक्त केला संशय