Wednesday, July 3, 2024

बॉलिवूडची स्टाईलिश अभिनेत्री समिरा रेड्डी आता दिसते ‘अशी’, व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क

हिंदी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या सोज्वळ सौंदर्याने आणि आपल्या अभिनयाने सिने जगतात अल्पावधीत छाप पाडली होती. यामध्ये अभिनेत्री समिरा रेड्डीचे (Samira Reddy) नाव पहिल्यांदा घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने समिरा रेड्डीने सिने जगतात अल्पावधीतच चांगली लोकप्रियता मिळवली होती. समिराने मोजक्याच भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. परंतु नंतरच्या काळात ति सिने जगतात फारशी दिसली नाही. सध्या तिचा सोशल मीडियावरील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये अभिनेत्रीचा बदललेला लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. 

अभिनेत्री समिरा रेड्डी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या ती सिने जगतापासून दूर असली तरी आजही तिच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगलेली पाहायला मिळते. समिराने अभिनेता सोहेल खानसोबत मैंने दिल तुझको दिया या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात संजय दत्त, राजपाल यादव, कबीर बेदी, दिलीप ताहिल, सरफराज खान अशा अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटानंतर समिराने रेस, मुसाफिर, तेज, नो एंट्री, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्यानंतर अभिनेत्रीने सिनेजगताला रामराम ठोकला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sameera Reddy (@reddysameera)

 

समीराने २०१४ मध्ये समीर वर्देसोबत लग्न केले. त्यानंतर समिराने मे २०१५ मध्ये मुलाला जन्म दिला. ती आता दोन मुलांची आई असून पहिल्यापेक्षा अभिनेत्रीचा लूक आता खूपच बदलला आहे. तिचे वजन पहिल्यापेक्षा खूपच वाढले असून तिला आता मेकअपही करावासा वाटत नाही. सध्या सिनेमांमध्ये ती फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र खूपच सक्रिय असते. तिचे व्हिडिओ  सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल हो असतात.

हेही वाचा –

दिग्गज गायक किशोर कुमारांची कार्बन कॉपी आहेत अमित कुमार, फोटो पाहिला का?

‘पॅंट घालायची विसरलीस का’, म्हणत नेटकऱ्यांनी कियारा अडवाणीची उडवली खिल्ली, पाहा व्हिडिओ

‘अशी’ झाली ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाची शूटिंग, आलिया भट्टने केला बीटीएस व्हिडिओ शेअर

 

हे देखील वाचा