सध्या सगळीकडे लग्नांचा मोसम चालू झाला आहे. या मोसमात मराठी, हिंदीमधल्या अनेक जोड्यांनी त्यांची लगीनगाठ बांधली आहे. एकीकडे रियलमध्ये अनेक जोड्या लग्नबंधनात अडकत आहे, तर दुसरीकडे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा लग्नांचा मोसम चालू झाला आहे. याच मुहूर्ताचा लाभ घेत टीव्हीवरील लोकप्रिय जोडपं सई आणि आदित्य लगीनगाठ बांधत आहे.
झी मराठीची लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’ मध्ये इतके दिवस प्रेक्षक ज्या दिवसाची वाट पाहत होते, अखेर तो दिवस आला आहे. आदित्यने सईला लग्नाची मागणी घातली आणि प्रेक्षकांची त्यांच्या लग्नाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली. आता ही उत्सुकता लवकरच संपणार असून, सई आणि आदित्य या प्रेमाच्या महिन्यात आणि प्रेमाच्याच दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारीला लग्न करणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच चॅनेलवर या दोघांच्या लग्नाचा प्रोमो देखील दाखवला होता. मात्र, आता ह्या लग्नाची तारीख घोषित झाली आहे. सध्या मालिकेत सुयश आणि सईच्या लग्नाच्या आधीचे विधी दाखवले जात आहेत. लवकरच मालिकेत वळण येत सई, आदित्य यांचे लग्न होणार आहे.
विराजसने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या लग्नाची तारीख घोषित करणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
सई आणि आदित्यने त्यांच्या फॅन्ससाठी व्हेलेंटाइन डे चे सर्वोत्तम गिफ्ट दिले आहे.
हेही वाचा-
‘ही’ गोड चिमुकली आहे मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री; ओळखा पाहू बरं
“मेरी तनहाई और मसाला चाय बस्स”, भन्नाट कॅप्शनसह प्राजक्ताने नवीन फोटो केला शेअर