Saturday, June 29, 2024

‘मी सलग तीन दिवस झोपलो नाही..’ विराजस कुलकर्णीच्या व्हायरल पोस्टवरुन नेटकऱ्यांनी घेतली चांगलीच मजा

 विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘माझा होशील ना’ या लोकप्रिय मालिकेत विराजसने भूमिका साकारली होती.या भूमिकेने त्याला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा विराजस सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतो. आपल्या सोशल मीडियावरुन तो अनेक फोटो आपल्या चाहत्यांशी तो शेअर करत असतो. सध्या विराजसच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. कोणती आहे ती पोस्ट चला जाणून घेऊ. 

अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या शाही विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. या लग्नाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अनेक दिवस विराजस आणि शिवानीच्या प्रेमप्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू होती. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता लग्नानंतर विराजस कुलकर्णीच्या एका पोस्टमुळे नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच थट्टा केलेली पाहायला मिळत आहे.

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन विराजसने ही पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याचा ब्लॅक अँन्ड व्हाईट फोटो पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत विराजसने दिलेल्या कॅप्शनने मात्र सर्वांनाच थक्क केले आहे. ज्यामध्ये त्याने मी तीन दिवस झोपलेलो नाही, कारण अधूनमधून उठाव लागतं असा भन्नाट कॅप्शन दिला आहे. या कॅप्शनमुळे नेटकऱ्यांनी मात्र त्याची चांगलीच मजा घेतली आहे. विराजसच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका नेटकऱ्याने लग्न झालं की अधून मधून उठाव लागण साहजिक आहे अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे तर आणखी एकाने लग्नानंतर झोप न होण साहजिकच असे म्हणत विराजसची चांगलीच मजा घेतलेली दिसत आहे. सध्या विराजसची ही पोस्ट सगळीकडेच चर्चेचा विषय ठरल आहे.

हे देखील वाचा